राष्ट्रीय लोक अदालत 13 ऑगस्ट रोजी

कोल्हापूर, दि. 20 : राष्ट्रीय लोक अदालतीचे शनिवार दि. 13 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रितम पाटील यांनी दिली आहे. या अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन प्रलंबित दिवाणी व तडजोडयोग्य फौजदारी खटले, मोटर अपघात खटले तसेच दखलपूर्व खटले ठेवण्यात येणार आहेत.

Advertisements

याव्दारे सर्व बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपन्या तसेच एमएसईबी, राज्य परिवहन महामंडळ व इतर संबंधित कंपन्यांनी या लोकअदालतीध्ये आपल्या प्रिलिटीगेशनच्या केसेस ठेवायच्या असतील तर त्यांनी योग्य कागदपत्रासह दि. 1 ऑगस्ट पर्यंत सचिव,‍ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!