बातमी

मुरगूडच्या ” आकाश दरेकर “यानां उत्कृष्ट अभियंता ”आंतरराज्य पुरस्कार “

बेळगांव येथे दिमाखदार सोहळ्यात केले सन्मानित

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल अभियंता श्री .आकाश दरेकर यानां बेळगांव येथिल”नॅशनल रुलर डेव्हलेपमेंट फौडेशन ” तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र , कर्नाटक , गोवा राज्याचा ” आंतराज्य पुरस्कार ” दि .०८ / १० / २०२२ रोजी बेळगांव येथे दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला . पुरस्कार सोहळ्यास गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री . लक्ष्मीकांत पार्सेकर , कर्नाटकच्या माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनुर , बेळगांवचे खासदार श्री . अमरसिंह पाटील , बेळगांवचे माजी -आमदार श्री . संजय पाटील, आमदार निलेश लंके, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे व-इतर मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.

दरेकर कुटूंबाने घरी येताच आकाश चा पेढा भरवून असा यथोचित सत्कार केला .

बांधकाम क्षेत्रातील त्यांच्या उत्कष्ट कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार त्यानां बहाल करण्यात आला . सामाजिक कार्यातही त्यानीं समाजामध्ये आपला एक वेगळा ठसा उमठविला आहे .आतापर्यंत केलेल्या उत्कृष्ठ कामांची ही एक पोहोच पावतीच म्हणावी लागेल. सहकार , सामाजिक , शैक्षणिक , आरोग्य व बांधकाम क्षेत्रातील, लोकानां पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .सन्मानचिन्ह , अभिनंदन पत्र , म्हैसूर फेटा व चंदनाचा हार देऊन या दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *