मुरगूड ( शशी दरेकर ) : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा मुरगुड मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पौष शुल्क, द्वादशी शके १९४५ या शुभ दिवशी अयोध्या मध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा झाला.रामजन्मभूमीवर राम बांधण्यात येत असलेल्या मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात श्रींरामाच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान झाली .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा झाला.
मुरगुड शहरामध्ये तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . पहिल्या दिवशी चित्रकला स्पर्धा, भजन दुसऱ्या दिवशी प्रजापिता ब्रह्मकुमारी यांचे प्रवचन आयोजित केले होते . दुपारी तरुणांनी श्रीराम युवा चैतन्य मोटरसायकल रॅली काढली संपूर्ण शहरांमधून फिरून या मोटरसायकलीचा समाप्ती राम मंदिर येथे करण्यात आली.
ह भ प हिंदुराव गोधडे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते . मुख्यदिवशी 22 जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता श्रीराम मंदिर येथील श्री राम मूर्तीस महा अभिषेक घालण्यात आला यानंतर लिटल मास्टर गुरुकुल यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली यावेळी चिमुरड्यांनी राम . लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्यासह रामायणातील अनेक पात्रांची वेशभूषा केली होती . शोभायात्रा नाका नंबर एक पासून राम मंदिर इथपर्यंत काढण्यात आली . यानंतर लहान मुलांनी नृत्य आविष्कार सादर केला यानंतर महिलांसाठी सामुदायिक रामरक्षा पठण घेण्यात आले.
आयोध्या येथील राम मंदिर मध्ये प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीवर आयोध्या येथून आलेल्या अक्षदा वाहण्यात आल्या . त्यानंतर पुष्पवृष्टी करून महाआरती करण्यात आली यानंतर हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला 3000 लाडूंचे वाटप भावीक भक्तांना करण्यात आले .संध्याकाळी चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ पार पडला . यानंतर दीपोत्सव आतिशबाजीसह साऊंड लावून हा सोहळा साजरा करण्यात आला .याच बरोबर कागल तालुका भाजप अध्यक्ष दगडू शेणवी यांनी बस स्थानक परिसर येथे दोन हजार लाडूंचे वाटप केले. आत्मरूप गणेश मंदिर येथे नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ यांच्या वतीने प्रभू श्रीराम यांची प्रतिमा ठेवून उत्सव साजरा करण्यात आला.
शहरांमध्ये घरोघरी दारासमोर आकर्षक रांगोळी काढून तसेच घराघरात गोड पदार्थांचे सेवन करून नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला . त्याचबरोबर शहरांमध्ये संपूर्ण दिवस मांसाहार बंद ठेवण्यात आला होता.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आयोध्या श्रीराम प्रभू प्राण प्रतिष्ठापना सोहळा उत्सव समिती मुरगुड श्रीराम जन्मभूमी न्यास उपखंड मुरगुड, मुरगुड मंडल यांच्या वतीने करण्यात आले होते .