बातमी

संस्कार हासबे ची राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील राणाप्रताप हॉलीबॉल क्लबचा खेळाडू व शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी कु.संस्कार निवृत्ती हासबे ( मुरगूड ) याची मिरज येथे होणाऱ्या १४ वर्षा खालील राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागीय संघात निवड झाली आहे.

त्यास हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर, संभाजी मांगले, अजित गोधडे , विनोद रणवरे, सुहास भारमल, अमित साळोखे यांचे मार्गदर्शन तर भारतीय हॉलीबॉल महासंघाचे सह सचिव प्रा . बाळासाहेब सुर्यवंशी , राणाप्रतापचे अध्यक्ष सुखदेव येरुडकर , राष्ट्रीय पंच भालचंद्र आजरेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *