बातमी

इचलकरंजी हे देशाचे मँचेस्टर होण्यासाठी बँका व उद्योजकानी प्रयत्न करावेत -आरबीआय महाव्यवस्थापक कल्पना मोरे

कोल्हापूर, दि. 23 :- इचलकरंजी हे फक्त महाराष्ट्राचे मँचेस्टर न राहता सर्व उद्योजक व बँका यांच्या समन्वयाने इचलकरंजीस देशाचे मँचेस्टर झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या वित्तीय समावेशन विकास विभागाच्या महाव्यवस्थापक श्रीमती कल्पना मोरे यांनी केले.

दरबार बँक्वेट हॉल, फॉरचुन प्लाझा इचलकरंजी येथे रिजर्व बँक ऑफ इंडिया तर्फे आयोजित एमएसएमई (MSME) बैठकीदरम्यान श्रीमती मोरे बोलत होत्या.श्रीमती मोरे पुढे म्हणाल्या की, बँकानी ग्राहकांना आपल्या परिवारासारखी वागणूक देऊन त्यांच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करावे. यावेळी ग्राहकांकडून उपस्थित केलेल्या काही समस्यांचे तत्काळ निराकरण देखील त्यांनी केले.

इचलकरंजी येथे रोजगार निर्मितीसाठी पोषक वातावरण असल्याने सर्व बँकांनी त्यांच्या विशेष शाखा सुरू कराव्यात

या चर्चेदरम्यान विविध ग्राहक तसेच असोसिएशन चे पदाधिकारी यांनी आपले अडचणी व सूचना रिजर्व बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यामध्ये सीजीटीएमएसई फी, सीजीएफएमयू फी, व्याजदर मध्ये सवलत, कोविड काळात शासन निर्देशानुसार जारी केलेल्या Emergency Credit line Guarantee scheme या योजना पुन्हा सुरू करणे ई. बाबींचा विचार शासनाकडून होणेची मागणी करून बँकांनी आपले सेवा शुल्क मध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा देणे ची सुद्धा विनंती असोसिएशन च्या पदाधिकार्याणी केली. या चर्चासत्रादरम्यान रिजर्व बँकेस प्राप्त सर्व सूचना संबंधित विभागास निर्देशित करून योग्य तो पाठपुरावा करू असेही श्रीमती कल्पना मोरे यांनी नमूद केले. तसेच इचलकरंजी येथे उद्योगधंद्याना पोषक वातावरण असून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणारे हे क्षेत्र असल्याने येथे सर्व प्रमुख बँकेच्या एमएसएमईच्या विशेष शाखा सुरू करणेबाबत विविध बँकांच्या वरिष्ट अधिकाऱ्याना सूचना केल्या.

बँक ऑफ इंडिया पुणे चे उपमहाव्यवस्थापक मिलिंद गवसाने यांनी इचलकरंजी हे आधीपासूनच आर्थिक साक्षर असून येथील लोकांमध्ये आर्थिक शिस्त चांगली रुजलेबाबत नमूद केले. ग्राहक व सर्व बँकांमध्ये योग्य समन्वय साधून जिल्ह्याची लिड बँक या नात्याने सर्व ग्राहकांना सुविधा देणेबाबत योग्य ती कार्यवाही करनेत येईल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच महिला उद्योजकांना प्रोत्साहन देऊन त्यानाही उद्योग क्षेत्रामध्ये आघाडीवर आणणेसाठी प्रयत्न करावेत असे आवहन त्यांनी केले.

यावेळी सिडबी पुणेचे उपमहाव्यवस्थापक रमाकांत राहाटे, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे उपमहाव्यवस्थापक श्री आर. डी . देशमुख, बँक ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय उपमहाव्यवस्थापक श्री मिलिंद गवसाने, स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे चे उपमहाव्यवस्थापक श्री एम. एन. प्रसाद, बँक ऑफ बडोदा पुणे चे उप महाव्यवस्थापक श्री एम. निशात, बँक ऑफ इंडिया कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक श्री हेमंत खेर, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक श्री गणेश गोडसे व कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सर्व प्रमुख बँकांचे विभागीय/क्षेत्रीय व्यवस्थापक तसेच शहरातील विविध व्यवसायसंबंधी क्लस्टर/असोसिएशन चे पदाधिकारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रिजर्व बँक ऑफ इंडियाचे अधिकारी विश्वजित करंजकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *