मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंती निमित महाविद्यालयातील कै. दादोबा मंडलिक सभागृहात राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार व स्पर्धा समन्वयक प्रा डॉ शिवाजी होडगे यांनी दिली.
ते म्हणाले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : स्वप्न आणि सत्य, राजकारणातील दीपस्तंभ: खा. सदाशिवराव मंडलिक, पर्यावरण : विनाशाचा अखेरचा इशारा, वेड मोबाइलचे, विस्मरण भविष्याचे. समाजाचे मुकेपण: अधोगतीचे कारण . हे स्पर्धेचे विषय आहेत. उदघाटन १ आक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ . नंदकुमार मोरे याच्या हस्ते होणार आहे. महाविद्यालय विकास समिती व मंडलिक युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अडव्होकेट वीरेंद मंडलिक हे समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत. विजेत्या पाहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रम रुपये ५००१/-, ३००१/- , व २००१/- या रोखीच्या बक्षिसांसह चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बक्षिस वितरण १ आक्टोबर रोजी सायकाळी स्पर्धा संपल्या नंतर लगेचच केले जाणार आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्यानी कॉलेज मधील दोन स्पर्धक पाठवून या प्रबोधनपर उपक्रमाला सक्रीय सहकार्य करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. कुंभार व स्पर्धा समन्वयक प्रा .डॉ . शिवाजी होडगे यांनी केले आहे.