24/09/2022
0 0
Read Time:6 Minute, 23 Second

देवानंद पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन

मुरगूड (शशी दरेकर) : तीस वर्षांपासून देवानंद पाटील यांच्यासारखा क्रियाशील कार्यकर्ता सत्तेपासून
वंचित राहिला. त्यांना लवकरच संधी देण्यासाठी मी व खासदार संजय मंडलिक प्रयत्नशील आहोत, असे
प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. निढोरी (ता.कागल) येथील विविध विकासकामांचा शुभारंभ व निढोरी माजी सरपंच देवानंद पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘सामाजिक चळवळीचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी देवानंदसारख्या अभ्यासू कार्यकर्त्याला बळ दिले पाहिजे.’ विकास कामांचा शुभारंभ रविवारी (दि.२४) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांच्या शुभहस्ते विद्यामंदिर निढोरीच्या मैदानावर करण्यात आला. याप्रसंगी देवानंद पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, सामाजिक कार्यकर्ते बंटी सावंत आणि सरपंच अमित पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी देवानंद पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त जागर महिला शक्तीचा या उपक्रमा अंतर्गत खास महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाचे उद्‌घाटन माऊली संस्था कागलच्या अध्यक्ष आमरिन मुश्रीफ व नगराध्यक्ष माणिक माळी यांच्या हस्ते सुहासिनीदेवी पाटील (मुरगूड) यांच्या अध्यक्षतेखाली झाले. बक्षीस वितरण बिद्रीच्या संचालिका अर्चना पाटील आणि माजी सरपंच शामल पाटील यांच्या हस्ते व टीव्ही सिरीयल ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील अक्षया देवधर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

बिद्री कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे, संताजी घोरपडे शुगर कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ, जि. प. सदस्य युवराज पाटील, केडीसी बँक संचालक भैय्या माने, बिद्री साखर कारखाना संचालक प्रवीणसिंह पाटील, प्रकाश गाडेकर, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, जि.प.सदस्य शशिकांत खोत, मनोज फराकटे, कागल पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर, बिद्रीचे संचालक उमेश भोईटे, सूर्यकांत पाटील केशव काका पाटील, बापूसाहेब भोसले, प्रविण भोसले, जगदीश पाटील ईगल प्रभावळकर, दिनकर, कोतेकर, डी.डी.चौगले, नितीन दिंडे, प्रकाश भिऊंगडे, दत्ता पाटील, नंदू पाटील, किरण पाटील, जयसिंग भोसले, राजू आमते, प्रदीप चव्हाण, मसू पाटील, केशव पाटील, डी.एम.चौगले, अर्चना पाटील, केशवकाका पाटील, (माजी व्हा.चेअरमन,बिद्री साखर), नंदकुमार पाटील (माजी संचालक,बिद्री साखर), जयश्री पाटील (माजी सरपंच,निढोरी), बी.एम.पाटील (उपसरपंच,भडगाव), सविता चौगले (उपसरपंच,निढोरी), शशिकांत पाटील, वाय.एस.कांबळे सर, बी.एल.मोरबाळे, हिंदुराव चौगले, रविंद्र शिंदे सर, रंगराव रंडे, शामराव सावंत, राजेंद्र पाटील, भैरवनाथ मगदूम, गणपत मगदुम, बी.एल.कांबळे, रमेश वाईंगडे, बाजीराव चौगले, सचिन मोरबाळे, विकास सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा निकाल : संगीत खुर्ची स्पर्धा : प्रथम क्रमांक सविता युवराज चौगुले (सोनाळी, ता.कागल), द्वितीय क्रमांक मनिषा महादेव पाटील (देऊळवाडी ता.करवीर), तृतीय क्रमांक अर्चना रणजीत चौगुले (भडगाव ता.कागल), उत्तेजनार्थ प्रेरणा गौतम कांबळे (निढोरी ता. कागल).
होम मिनिस्टर स्पर्धा : प्रथम-पूनम गणेश डवरी (निढोरी), द्वितीय- सोनाली अजित चौगुले (मडिलगे बु), तृतीय- दिप्ती दयानंद बुगडे (निढोरी).

घागर घेऊन धावणे : प्रथम क्रमांक वर्षा बाळासो कळमकर (निढोरी), द्वितीय क्रमांक -सुजाता नाना हंचनाळे (पिंपळगाव), तृतीय क्रमांक- संगीता संदीप कातोरे (सोनाळी), चतुर्थ क्रमांक- वैशाली सुनिल वडर (निढोरी)
रस्सीखेच स्पर्धा : प्रथम क्रमांक – सोनसाखळी महिला मंडळ (सोनाळी ता. कागल), द्वितीय क्रमांक भावेश्वरी वेदगंगा महिला ग्रुप (निढोरी ता.कागल), तृतीय क्रमांक- राजमाता महिला मंडळ (सोनाळी ता.कागल),चतुर्थ क्रमांक – रमाबाई महिला ग्रुप (निढोरी ता.कागल), पंच म्हणून प्रा.रवींद्र शिंदे, एकनाथ आरडे, अजित मोरबाळे, नेताजी कळंत्रे, रमेश वाइंगडे यांनी काम पाहिले तर समालोचन विकास सावंत यांनी केले.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!