बातमी

मुरगूडच्या ” शिवम् लोहार “यानें अनेक सापानां दिले जीवदान


मुरगूड ( शशी दरेकर ) :
मुरगूड ता . कागल येथिल शिवम् कृष्णा लोहार यानें अलिकडे अनेक सर्पानां जीवदान दिले , त्यामध्ये नाग , धामीण , घोणस , सापटुळी , अजगर , अशा अनेक जातीच्या सर्पानां जीवदान दिले आहे. नुकतेच कुरणी ( ता. कागल ) येथिल शिवानंद पाटील यांच्या घरी ” घोणस ” जातीचा अती विषारी साप पकडून त्याला जंगलात सोडून जीवदान दिले,

मुरगूड परिसरात साप दिसला की , शिवमला हमखास फोन येतो , कसलाही साप असला तरी तो त्याला कसलही दुखापत न करता हमखास पकडतो .सापा विषयी शिवमला मोठी आस्था असल्याने जिथे साप पकडतो त्या ठिकाणी त्या सापा विषयी पूर्ण माहिती नागरीकात जनजागृती करत त्याला मारू नये यासाठी तो प्रयत्नशिल असतो .
या वर्षात त्यानें अनेक सापानां जीवदान दिले आहे .कोठेही साप दिसला तर ७०८३७३७५७५या फोन
नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन शिवम् लोहार यानीं केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *