सोन्याचे दर पुन्हा घसरले: २९ सप्टेंबर २०२६ रोजी २४ व २२ कॅरेट सोन्याचे ताजे भाव; पाहा प्रमुख शहरातील आजचे दर

Gold bars and balance scale in front of falling financial market charts

विशेष बातमीपत्र: मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली आहे. जागतिक बाजारातील दबाव, वाढते बॉण्ड यील्ड आणि अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय बाजारात सोन्याचे भाव प्रति १० ग्राम सुमारे ₹३,८०० ते ₹४,००० ने कमी झाले आहेत. एमसीएक्स (MCX) वर सोन्याचे दर प्रति १० ग्राम ₹१,४६,५०० ते … Read more

श्री गहिनीनाथ सहकार समूहातील विविध संस्थांच्या वार्षिक सभा उत्साहात संपन्न

कागल: श्री गहिनीनाथ सहकार समूहातील श्री दिलीपरावजी सणगर पतसंस्था, श्री गहिनीनाथ दूध संस्था, श्री गहिनीनाथ विकास संस्था व समूहातील इतर संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साही व मेळाव्याच्या वातावरणात पार पडल्या. सभेच्या सुरुवातीला सर्व सभासदांचे स्वागत महेश मगदूम यांनी केले. याप्रसंगी समूहाचे अध्यक्ष श्री सम्राट सणगर यांनी प्रास्ताविक केले. आपल्या भाषणात त्यांनी सर्व संस्थांच्या कामाचा सविस्तर … Read more

मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघात डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती साजरी व अभियंता दिन साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ):-           येथील ज्येष्ठ नागरिक संघात डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती व अभियंता दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभियंता शाहू फर्नांडिस  होते.                 यावेळी डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन शाहू फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाहू फर्नांडिस ,पी जी चौगले, श्रीपतराव खराडे, जयकुमार गुजर, संभाजी आंगज, सुधीर गुजर, … Read more

सामाजिक बांधिलकी जपत भारतीय टपाल विभागाचा गणेशोत्सवात सक्रिय सहभाग

भारतीय टपाल विभागाचा गणेशोत्सवात सामाजिक व जनसेवेचा कौतुकास्पद पुढाकार पुणे: पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय टपाल विभागाने विविध लोकोपयोगी व सामाजिक उपक्रमांद्वारे आपले योगदान दिले आहे. “डाक सेवा, जन सेवा” या मूलमंत्राला अनुसरून भारतीय टपाल विभागातर्फे गणेश भक्तांसाठी आणि पुणेकरांसाठी आरोग्य सेवा, विशेष टपाल सुविधा व पोलीस दलासाठी विश्रांतीची सोय उपलब्ध करून देण्यात आली … Read more

किल्ले पाहिल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज कळणार नाहीत : डॉ. अमर अडके

कागल : ‘छत्रपती श्री शिवाजी महाराजांना केवळ युद्ध आणि लष्कराच्या भूमिकेतून पाहू नका. त्यांना समजून घेण्यासाठी सह्याद्री समजून घ्या. किल्ले पाहिल्याशिवाय छत्रपती श्री शिवाजी महाराज कळणार नाहीत. इतिहासात भूगोल असतो आणि भूगोल कळल्याशिवाय इतिहासही कळत नाही,’ असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी केले. स्वर्गीय जी. एन. जोशी जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त श्रीराम मंदिर … Read more

कोल्हापुरी चप्पल युनिट उद्घाटन: महिला सक्षमीकरणाची दिशा

सांगरुळ मधील कोल्हापुरी चप्पल युनिटचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सुमारे सव्वा कोटींचा प्रकल्प सुरु जिओ टॅग मानांकन असलेल्या कारागिरांकडून होणार चप्पल निर्मिती   कोल्हापूर (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सांगरुळ येथे सुरु करण्यात आलेल्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले. महिला … Read more

अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नियमभंग करणाऱ्यांना कठोर इशारा; महाराष्ट्रात धडक कारवाई सुरू

FDA च्या कारवाईचे फडणवीसांकडून समर्थन; म्हणाले – ‘ही कारवाई अशीच सुरू राहील’ अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या माध्यमातून अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरू असलेल्या जोरदार कारवाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. मुंबईतील या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “ही कारवाई अशीच पुढे सुरू राहील.” कडक … Read more

८ वा वेतन आयोग: फिटमेंट फॅक्टर आणि वेतनवाढीबाबत केंद्र सरकारचे संसदेत मोठे स्पष्टीकरण; वाचा सविस्तर

नवी दिल्ली: ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) फिटमेंट फॅक्टर आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विविध चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पहिल्यांदाच संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फिटमेंट फॅक्टरसह वेतन आयोगाच्या सर्व शिफारशींवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार केवळ ८ व्या वेतन आयोगालाच आहे, असे सरकारने स्पष्ट केले … Read more

नवीन जनरेशन टोयोटा फॉर्च्युनर लवकरच भारतात; पाहा काय असणार बदल आणि किंमत!

New generation Toyota Fortuner coming soon in India मुंबई: भारतीय ऑटोमोबाईल बाजारात प्रचंड लोकप्रिय असलेली आणि एसयूव्ही (SUV) प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेली ‘टोयोटा फॉर्च्युनर’ (Toyota Fortuner) आता एका नवीन आणि अपडेटेड अवतारात येण्यासाठी सज्ज झाली आहे. टोयोटाने नुकतीच भारतात आपली ‘हायलक्स’ (Hilux) कार किरकोळ बदलांसह लाँच केली आहे. याच धर्तीवर आता कंपनी आपली सर्वाधिक पसंतीची … Read more

कागल तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘जनसेवा सप्ताह’

विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन कागल (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कागल तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तालुक्यात ‘जनसेवा सप्ताह’ जाहीर करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि विद्यार्थीभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, कागल येथील ‘स्वर्गीय गणपतराव गाताडे बौद्धिक आश्रम विद्यालय’ … Read more

error: Content is protected !!