मुरगूडच्या सानिका स्पोर्टस फौंडेशनतर्फे साडी व फराळ साहित्याचे वाटप

मुरगूड (शशी दरेकर) :येथील सानिका स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने मुरगूड शहरात धुणीभांडी करणाऱ्या व मुरगूड नगरपरिषदेत आरोग्य विभागाकडे काम करणाऱ्या महिलांना दिपावली निमित्त साडी वाटप तसेच आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना मोती साबण, सुवासिक तेल , एक किलो पोहे, उटणे, पणती पाकीट साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवराज विद्यालयाचे माजी प्राचार्य जीवनराव साळोखे ,मुरगूड विद्यालयाचे उपप्राचार्य … Read more

Advertisements

विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करून इतरांना आनंद वाटा – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

शिवराज विद्यालयात हरित सेनेच्या वतीने फटाकेमुक्त दिवाळी अभियान मुरगूड ( शशी दरेकर ) : पर्यावरण संवर्धन भाषणातून नको तर प्रत्यक्ष कृतीतून व्हावे. विद्यार्थ्यांनी आतापासून स्वतःला पर्यावरणाचे रक्षक बनवावे. प्रत्यक्ष कृतीतून निसर्गप्रेम जोपासावे. असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले. ते शिवराज विद्यालय येथे फटाकेमुक्त दिवाळी अभियान अंतर्गत राष्ट्रीय हरित सेनेच्या वतिने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना … Read more

केडीसीसी बँकेत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदानाचे वाटप

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०१९ पहिल्या टप्प्यात एक लाख, १३ हजार शेतकऱ्यांना मिळाले ४०९ कोटी प्रोत्साहनपर लाभ अनुदान कोल्हापूर, दि.२० : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा बँकेशी सलग्न असलेल्या … Read more

कागलमध्ये विकासकामांसाठी रंगतोय ‘श्रेयवाद’

आगामी विधानसभेसाठी रंगीत तालीम सुरू; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

करंजीवणे(भिकाजी मसवेकर) : सध्या कागलच्या नेत्यांनी पायाला भिंगरीबांधून मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा डेळय़ासमोर ठेऊन नेते आणि कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. गावोगावी कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी चढाओढ सुरू आहे. राज्यातील सत्तातंराचाही मोठा परिणाम कागलमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. इतकेच नाही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितासीठी इच्छुक असणारे प्रमुख कार्यकर्तेही एकमेंकाविरोधात खरपूस समाचार घेत आहेत. यानिमित्त विविध शासकीय योजना आणि विकासकांमांचे श्रेय घेण्यासाठी कागलमध्ये नेत्यांची जणू रंगीत तालीमच सुरु आहे.

आमदार मुश्रीफ-समरजित घाटगे कार्यक्रमात व्यस्त; खासदार संजय मंडलिकांची सावध भूमिका

मतदारसंघात बांधकाम कामगारांना साहित्य वाटप, पेन्शन योजना, ई-श्रम कार्ड वाटप, बैठका, मेळावे, विकासकामांचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात राबवले जात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमांतून विविध योजनांचे ‘श्रेय’ पदरी पाडण्याचा प्रयत्न सुरु असून दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार आरोप करत आहेत. तर कार्यकर्तेही मोठय़ा प्रमाणात सक्रीय झाले आहेत.

आमादार मुश्रीफांच्या पाठीशी संजयबाबांचे पाठबळ

आगामी विधानसभेसाठी दोन्ही नेत्यांनी कंबर कसली आहे. यात विशेष म्हणजे माजी आमदार संजयबाबा हे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा दुरंगी होणार असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. गत विधानसभेला झालेल्या तिरंगी लढतीचा फायदा-तोटा लक्षात घेऊनच पुढील धोरण ठरवले जात आहे. कारण गत निवडणुकीत मुश्रीफ आमदार झाले असले तरी समरजित घाटगे यांनीही दोन नंबरचे मताधिक्य मिळवले तर माजी आमदार संजयबाबा तीन नंबरवर गेले. यामुळे समरजित घाटगे यांचे मनोबाल नक्कीच उंचावले. त्यानंतर त्यांनी मोठय़ा प्रमाणात जनसंपर्क वाढवला. त्यांच्या जोडीला त्यांची पत्नी नवोदिता घाटगे यांनीही महिला मेळावे घेऊन मताधिक्य वाढवण्यावर भर दिला. राज्यातील सत्तातंरामुळे देखील समरजित घाटगे यांना मोठे पाठबळ मिळाले आहे.

दुसरीकडे आमदार हसन मुश्रीफ यांनी मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन करताना संजयबाबांना सोबत घेतले आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्यांची उपस्थिती आहे. त्यांच्या भाषणात ते मुश्रीफांच्या विकासकामांचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. सध्या सुरु असणऱया योजना आमादार मुश्रीफ यांच्यामुळेच सुरू झाल्याचे आवार्जुन सांगत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेला ते मुश्रीफांच्या पाठीशी ठाम असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यांचाही गट मोठा असल्याने ते मुश्रीफांच्या पाठीशी राहिल्यास मुश्रीफ आगामी विधानसभा लिलया पेलू शकतात ? परंतू त्यासाठी अजून दीड-दोन वर्षे बाकी आहेत. त्याचबरोबर गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, अंबरिषसिंह घाटगे हे देखील सक्रीय झाले असून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवत आहेत.

मंडलिकांची भूमिका मात्र गुलदस्त्यात

आघाडीबरोबर असूनही गोकुळमध्ये विरेंद्र मंडलिकांचा झालेला पराभव आणि सध्या राज्यात झालेले सत्तांतर यामुळे खासदार संजय मंडलिक यांची ठोस भूमिका दिसून येत नाही. सध्या ते कोणावरही टीका-टिपण्णी करत नाहीत. शिंदे गटासोबत जाण्याचा त्यांचा निर्णय असला तरी कागलमध्ये त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतू विरेंद्र मंडलिक हे समरजित घाटगे यांच्या काही कार्यक्रमाला उपस्थिती लावतात.

2019 च्या मताधिक्यावरुन 2024 ची फिल्डिंग

2019 साली कागल विधानसभा निवडणूक तिरंगी झाली होती. यामध्ये आमदार हसन मुश्रीफ यांना 1,16,434 मते, समरजित घाटगे यांना 88,303 मते तर संजयबाब यांना 55, 657 अशी मते पडली होती. समरजित घाटगेंनी अपक्ष निवडणूक लढवत मिळवलेली मते लक्षणीय ठरली होती. त्यामुळे 2024 ची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून समरजित घाटगेंनी जनसंपर्क वाढवला आहे. तर आमदार मुश्रीफ यांनी संजयबाबांना सोबत घेऊन वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये खासदार संजय मंडलिक यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणारी असून मतांची गोळाबेरीज आत्तापासूनच सुरू असल्याचे चित्र सध्या कागलमध्ये दिसत आहे.

जि. प., पं. स.चे इच्छुकही सक्रीय

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी काही प्रमुख कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यांच्याकडूनही विविध उपक्रम राबवले जात आहेत. इतकेच नाही तर संधी मिळेल त्या ठिकाणी विरोधी गटावर आरोप-प्रत्यरोप करत आहेत. आपल्याच नेत्याने शासकीय योजनांसाठी कसा पाठपुरावा केला याचा दाखल जाहीर कार्यक्रमातून मतदारांना देत आहेत.

करनूर मध्ये एका परप्रांतियाचा ओड्यात वाहून जाऊन मृत्यू

कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे कुमार विद्यामंदिर मराठी शाळे जवळील ओढा ओलांडताना मुकेश राजेश शर्मा वय वर्ष 22 राहणार मगदापूर खिरी, मोहम्मद उत्तर प्रदेश या परप्रांतीयाचा वाहून जाऊन मृत्यू झाला. कोगनोळी टोलनाक्याच्या पुढे अपघात झाल्यानंतर लोक मारतील या भितीने सैराभैर होहुन दोन परप्रांतीय रस्ता मिळेल तिकडे धावत सुटले. याच घाईगडबडीत करनूर तालुका … Read more

मुरगूडच्या ” गणेश नागरी सह. पतसंस्थेस ” ”आंतरराज्य पुरस्कार”

बेळगांव येथे दिमाखदार सोहळ्यात संस्थेला केले सन्मानित मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल अल्पावधीत सर्वांच्या जिव्हाळ्याची बनलेली श्री . गणेश नागरी सह .पतसंस्थेला बेळगांव येथिल “नॅशनल रुलर डेव्हलेपमेंट फौडेशन ” तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्याचा ” आंतराज्य पुरस्कार ” दि .०८ / १० / २०२२ रोजी बेळगांव येथे … Read more

मुरगूडमधील श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्थेतर्फे सभासदानां ४० लाखांची दिवाळी भेटवस्तूंचे वाटप

सेवक वृंदानांही १३ लाखावर बोनस मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी श्री .लक्ष्मीनारायण नारायण नागरी सह .पतसंस्थेच्या ३ हजार३०० सभासदानां सुमारे ४० लाखांच्या दिवाळी भेटवस्तू तसेच सेवकानां १३ लाखावर दिवाळी बोनस वितरणाचा कार्यक्रम मुरगूड येथे लक्ष्मीनारायणच्या मुख्य शाखेत सभापती श्री. अनंत फर्नांडीस, उपसभापती विनय पोतदार, जेष्ठ संचालक श्री. पुंडलिक डाफळे संचालक श्री. … Read more

मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सह पतसंस्थेतर्फे सभासदाना भेटवस्तूंचे वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथिल सर्वांच्या परिचयाची व विश्वासास पात्र ठरलेली श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदाना खाद्यतेल, हरभरा डाळ, मोती साबण, सुहासिक तेल बॉटल अशा दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तूंचे सभासदानां वितरण करण्यात आले. तसेच संस्थेतील कर्मचा-यानां २५ टक्केप्रमाणे बोनसचे वितरण करण्यात आले. भेटवस्तू व बोनस वितरणाची माहिती संचालक श्री … Read more

मुरगूडच्या ” आकाश दरेकर “यानां उत्कृष्ट अभियंता ”आंतरराज्य पुरस्कार “

बेळगांव येथे दिमाखदार सोहळ्यात केले सन्मानित मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल अभियंता श्री .आकाश दरेकर यानां बेळगांव येथिल”नॅशनल रुलर डेव्हलेपमेंट फौडेशन ” तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र , कर्नाटक , गोवा राज्याचा ” आंतराज्य पुरस्कार ” दि .०८ / १० / २०२२ रोजी बेळगांव येथे दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला … Read more

महिला, युवकाना उद्योजक बनविणे हाच आमचा अजेंडा – राजे समरजितसिंह

श्री मोरया 2022 पुरस्काराचा शानदार वितरण सोहळा मुरगूड ( शशी दरेकर ) – जास्तीतजास्त महिलांना तसेच तरुणांना उद्योजक बनविणे हाच आमचा अजेंडा आहे. तो यापुढेही सुरु राहील असे प्रतिपादन शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. शहरात राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनने श्री.मोरया पुरस्कार २०२२ चा वितरण सोहळा आयोजित करण्यात … Read more

error: Content is protected !!