बातमी

कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती ग्रंथाचे मुरगूडमध्ये प्रकाशन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. ए .जी .मगदूम’ यांच्या कागल तालुक्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती’ या ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार प्रा.संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले.

यावेळी पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ.ए. जी. मगदूम ,महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. टी. एम .पाटील ,कोल्हापूर जिल्हा कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष, प्रा. संभाजी मोरे ,मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी होडगे, कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. एम. ए. कोळी, सदाशिव गिरीबुवा, सुनील कडाकणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सदर संशोधन ग्रंथ सहकारी सेवा पतसंस्थांना दिशादर्शक ठरेल .असा आशावाद खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

सदर लेखनासाठी प्राचार्य डॉ जयंत कळके, प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार, जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे कार्यवाह आण्णासो थोरवत यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *