मुरगूडच्या युथ सर्कल यांच्या वतीने किल्ला रांगणा येथे स्वच्छता मोहिम

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील युथ सर्कल मुरगुड यांच्यावतीने भुदरगड तालुक्यातील किल्ले रांगणा येथे स्वच्छता मोहीम व ट्रेकिंग असा कार्यक्रम पार पडला. रांगणा किल्ला च्या चारी बाजूला एकुण 17 किलोमिटर चे अंतर चालत व देखरेख करत कांहीं ठिकाणची झालेली पडझड ,व स्वच्छता मंडळा मार्फत पार पाडली. कांहीं ठिकाणी बुरुज तर … Read more

संयुक्त महाराष्ट्र लढयातील महिला शाहिरींची कामगिरी

1 मे 1960 रोजी अनेक हुतात्म्यांच्या बलीदानानंतर ‘महाराष्ट्र राज्य’ अस्तित्वात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनतेने उस्फूर्तपणे मोठा सहभाग घेतला. पुरुषांबरोबर स्त्रियांचाही यात मोठा वाटा होता. आचार्य अत्रे यांनी या स्त्रियांचा मुक्तकंठाने ‘रणरागिनी’ असे बिरुद देऊन गौरव केला. या लढ्यात शाहिरांनी पोवाडे, गाणी, गीते रचून कलापथकाद्वारे लोकांपुढे सादर केली. याचा चळवळीला मोठा फायदा झाला. काही अग्रभागी … Read more

महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी – ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर

मुंबई : महाराष्ट्र हे देशाला नवी दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी असून आपल्या राज्याला गौरवशाली परंपरा असल्याचे गौरवोद्गार ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काढले. महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याच्या या जडणघडणीचा … Read more

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार ने स्वप्नाली प्रदीप कतगर सन्मानित

कागल / प्रतिनिधी : शैक्षणिक व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोल्हापूरच्या आनंदगंगा फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार देण्यात आले. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील विद्या मंदिर कणेरीवाडीच्या शिक्षिका स्वप्नाली प्रदीप कतगर (राहणार- सुळकुड तालुका -कागल) यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराने पुढील कार्यास निश्चितच प्रेरणा मिळाली आहे असे … Read more

उन्हाळी नाचणी उत्पादन प्रक्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नाचणी उत्पादनासोबतच प्रक्रियेकडे लक्ष देणे आवश्यक – जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर :  राज्यातला पहिलाच उन्हाळी नाचणी उत्पादनाचा प्रयोग सन 2018 ला पन्हाळा तालुक्यात यशस्वी ठरल्यानंतर आता दरवर्षीच तालुक्यात उन्हाळी नाचणीचे उत्पादन घेतले जात आहे. चालू वर्षात आत्मा विभाग व महाबीज यांच्या माध्यमातून 23 एकरांवर बिजोत्पादनासाठी उन्हाळी नाचणीची लागवड झाली असुन यातील काही नाचणी प्रक्षेत्रांची जिल्हाधिकारी राहुल … Read more

महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई :- मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो … Read more

केंद्र सरकारकडून शाळांना निधी मिळवून देण्यास कटीबद्ध – खासदार मंडलिक

मुरगूड ( शशी दरेकर ) – शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा सुधारला पाहिजे . गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्हयातील प्राथमिक शाळांना निधी मिळवून देण्यास कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. दौलतवाडी (ता . कागल ) येथे विरेंद्र भोसले युवा फौंडेशनच्या वतीने प्राथमिक शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण … Read more

राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यामध्ये प्राणी गणनेसाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 27 : कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यामध्ये दि. 5 व 6 मे 2023 रोजी बौध्द पौर्णिमेनिमित्त पाणस्थळावरील निसर्गानुभव कार्यक्रम 2023 साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पाणवठ्यावरील प्राणीगणना करण्यास इच्छुक उमेदवारांनी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन आवश्यक अर्ज डाऊनलोड करुन ‍दि. 30 एप्रिल 2023 पर्यंत www.census2023wlkop@gmail.com या संकेतस्थळावर अर्ज ई-मेल व्दारे पाठवावेत, असे आवाहन … Read more

भडगाव येथे ३० एप्रिला जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा

मॅट वरील कब्बडी स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत १६ संघ होणार सहभागी मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने हनुमान तरूण मंडळ भडगाव ता.कागल यांच्या वतीने कै.एच.एस.पाटील स्मृति चषक मॅटवरील खुल्या गटातील कब्बडी स्पर्धा ३० एप्रिल ते एक मे कालावधीत होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. प्राथमिक शाळेच्या क्रीडांणणावर स्पर्धा दोन दिवस प्रकाशझोतात होणार … Read more

मुरगूडच्या समाजवादी प्रबोधिनी व नगरपरिषद कामगार यांच्या वतीने ” विकास सावंत ” (सर) यांना शोकसभेत श्रद्धांजली

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड ( ता. कागल ) येथिल समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगूड व मुरगूड नगरपरिषद कामगार यांच्या वतीने ” विकास सावंत ” सर यानां श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित केली होती. निढोरीसह मुरगूड परिसरात सामाजिक चळवळीशी त्यांचा निकटचा सबंध होता. तरुण तडफदार, पुरोगामी विचारांचा वारसदार, शिक्षण प्रेमी, अभ्यासू व्यक्तिमत्व, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचे … Read more

error: Content is protected !!