मुरगुड... येथील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वितरण करताना दगडू शेणवी , बजरंग सोनुले ,एस पी पाटील, राजू चव्हाण आदी मान्यवर

मुरगुड ( शशी दरेकर ) – गरीब गरजू हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य फी संदर्भात जर काही अडचणी येत असतील तर मुरगुड ता. कागल येथील सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन ठामपणे उभा आहे. विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे आपल्या अडचणी मंडळाच्या कार्यकर्त्याजवळ व्यक्त केल्यास त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल मदतीचा हात सदैव पुढे राहील असे प्रतिपादन सानिका स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुरगुड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले.

ते मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येथील अकरावी बारावी च्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना शालेय साहित्य वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले होते.

Advertisements

स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य एस पी पाटील यांनी केले यावेळी उप मुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी, मेजर राजेंद्र सावंत, राजू चव्हाण, पी एस पाटील टी आर शेळके यूपी कांबळे एस एस पाटील यांची मनोगते झाली .

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

कार्यक्रमास एमडी खटांगळे, ए एस मांगोरे ,एम ए बसर्गे, जे टी पवार, व्ही.आर गडकरी, टी एस पाटील, अजित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते आभार एम एम कांबळे यांनी मांनले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!