मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा क्रीडा क्षेत्रात सदैव उल्लेखनीय कामगिरी करत असतो कुस्ती, कबड्डी, फुटबॉल, स्विमिंग, तिरंदाजी यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक खेळाडू महाराष्ट्राला व देशाला या कोल्हापूर जिल्ह्यातून दिले गेले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचा व महाराष्ट्राचा नावलौकिक आणखी वाढवायचा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला राज्याश्रय मोठ्या प्रमाणात मिळावा यासाठी प्रत्येक गावातील तालीम, तरुण मंडळे व्यायाम शाळा व गावातील मैदान अद्यावत होण्यासाठी भरघोस निधी द्यावा अशी मागणी युवा नेते वीरेंद्र संजय मंडलिक यांनी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा चार कोटी निधीचे बजेट आहे ते वाढवून मिळावे अशी प्रामुख्याने मागणी केली. यावेळी मंत्री संजय बनसोडे यांनी या मागणीचा आपण निश्चितच सहानुभूतीपूर्वक विचार करू असे अश्वस्त केले.
खासदार संजय मंडलिक यांच्या सुचने नुसार जिल्ह्यातील सर्व तरुण मंडळाच्या प्रतिनिधींना घेऊन लवकरच आपण पुन्हा एकदा क्रीडा मंत्र्यांना भेटण्याचे नियोजन केले आहे असे युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी सांगितले. निवेदन देताना इंदापूरचे आमदार दत्ता भारणे उपस्थित होते.