बातमी

ईडीकडून ताब्यात घेतले केडीसीसी बँकेचे अधिकाऱ्याचे जल्लोषी स्वागत

कागल : ईडीकडून ताब्यात घेतले केडीसीसी बँकेचे अधिकारी परत आले या आधिकऱ्याचे केडीसीसी बँकेत जल्लोषी स्वागत करण्यात आले, माजी मंत्री हसन यांचे या जिल्ह्यातील कागल तहसीलमधील रहिवासी आणि पुण्यातील त्यांच्या कार्यालयावर 11 जानेवारी रोजी छापे टाकल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) बुधवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (केडीसीसी) छापे टाकले होते.

[ays_poll id=”7″]

ईडीच्या पथकाने जिल्हा बँकेत टाकलेल्या छाप्यात तब्बल तीस तास तपासणी केली. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. पोलिस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आले होते. पण चौकशी पूर्ण करून त्यांना सोडण्यात आले. ते पाच अधिकारी बँकेच्या आवारात प्रवेश केल्यानंतर त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. कर्मचऱ्यातून जोरदार घोषणाबाजी करून सर्व जण एक असून ईडीला घाबरणार नाही असा घोषणाही दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *