बातमी

मुरगूड मध्ये ‘राष्ट्रीय कुस्ती’ ला सुरुवात

“६२० मल्लांचा सहभाग , तीन दिवस स्पर्धा चालणार ” शुभारंभाच्या कुस्तीत हरियानाचा सतिश कुमारची विजयी सलामी

मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथे विश्वनाथराव पाटील कला क्रिडा सांस्कृतिक व्यायाम मंडळच्यावतीने माजी नगराध्यक्ष प्रविणसिह पाटील यांच्या वाढदिवसानिमित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ दिमाखात करण्यात आला. स्पर्धेसाठी ६२० मल्लांनी नोंद केली आहे . मॅटवर चालणाऱ्या या कुस्ती स्पर्धा सलग तीन दिवस चालणार आहेत . स्पर्धेसाठी संयोजकांनी महाराष्ट्र केसरी सर्धेच्या धर्तीवर नेटके नियोजन केले आहे.

या स्पर्धेत मॅट पूजन गोकूळ चे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते व दिप प्रज्वलन व ध्वजारोहन स .पो.नि. विकास बडवे तर प्रतिमा पूजन सेवानिवृत दुय्यम निरीक्षक बाळासाहेब अवघडे यांच्या हस्ते करण्यात आले . शुभारंभाची खुल्या गटातील कुस्ती हरियानाचा सतिशकुमार विरुद्ध साताऱ्याच्या तुषार ठोंबरे यांच्यात चुरशीने लढत-झाली यामध्ये सतिशकुमार यांनी १०-४ गुण फरकाने कुस्ती जिंकली . खुल्ला गटात आदर्श गुंड ‘ यश वाळवट (पुणे), श्रीमंत भोसले , शहाजी फळे (इचलकरंजी ) , अनिल गिरीमल (सांगली) अक्षय तांबवे (अकलूज ), सिद्धाराम धायगुडे (सोलापूर) गौतम (सेनादल), महषीकेश आरकिले (पंढरपुर) आदिसह ३५ मल्लांनी खुल्या गटात सहभाग घेतला आहे .

आज झालेल्या कुस्तीत सखतार ( राष्ट्रकूल ) यांने विजय बचकुलेवर नेत्रदिपक विजय मिळवला तसेच यश वाळवट (पुणे ) यांने अनिल चोरडे ला पराभूत केले . आज झालेल्या कुस्ती मध्ये हर्षवर्धन माळी (म्हाकवे ) , गणेश वाघमारे (कोगिल ), पूर्वेश पाटील ( दिंडनेर्ली) ‘ शुभम पाटील ( कुशिरे) , प्रतिक पाटील (पाचगाव ) ‘ आदर्श गुंड (पुणे) आदिनी आपआपल्या गटात विजयी सलामी दिल्या आहेत.

प्रारंभी स्वागत राजू चव्हाण यांनी तर प्रास्ताविक अॅड सुधीर सावर्डेकर यानीं केले. याप्रसंगी नाविद मुश्रीफ, जि.प. सदस्य मनोज फराकटे, स .प. नि .विकास बडवे, कुमार ढेरे , दिग्वीजय पाटील , सत्यजित पाटील , विकास पाटील , शिवाजीराव चौगले , डी.डी. चौगले , रणजीत सुर्यवंशी , दिगंबर परीट , आदिसह कुस्तीप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते .
शेवटी आभार राहुल वंडकर यानीं मानले .

One Reply to “मुरगूड मध्ये ‘राष्ट्रीय कुस्ती’ ला सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *