मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने संघाच्या सदस्याकरिता एकेरी व दुहेरी कॅरम स्पर्धा संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या.
प्रथम सर्व स्पर्धकांचे स्वागत सचिव श्री .सखाराम सावर्डेकर यानीं केले. शिवराज विद्यालयाचे प्राचार्य श्री .पी डी माने यानीं कॅरम स्पर्धा कशा प्रकारे होणार याची माहिती देऊन त्यांनी या स्पर्धाचे नियम व अटी स्पर्धकानां-समजावून सांगत-पंच म्हणून काम पाहिले.
एकेरी कॅरम स्पर्धाचे उदघाटन संघाचे अध्यक्ष श्री गजानन गंगापूरे यानी तर दुहेरी कॅरम स्पर्धाचे उदघाटन संघाचे उपाध्यक्ष श्री. पी. डी. मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष गंगापूरे यानी स्पर्धा शांततेत, खिलाडूवृत्तीने, मैत्रीपूर्ण, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडाव्यात अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे कॅरम स्पर्धा अत्यंत अटीतटीची व उत्साहाच्या वातावरणात पार पडली.
स्पर्धैचा निकाल पुढीलप्रमाणे -एकेरी कॅरम स्पर्धा प्रथम क्रमांक -श्री . तुकाराम हरिभाऊ भारमल ५०१रु , द्वितीय क्रमांक -श्री . किशोरकुमार लक्ष्मण पाटील ३०१रु , तृतिय.क्रमांक -श्री . तानाजी केदारनाथ डवरी २०१ रु, उत्तेजनार्थ श्री . गणपती पांडूरंग सिरसेकर १०१रु.
दुहेरी कॅरम स्पर्धा -प्रथम क्रमांक श्री . तुकाराम भारमल, व श्री . महादेव वागवेकर ५०१रु , व्दितीय क्रमांक -श्री . किशोरकुमार पाटील , श्री . सिकंदर जमादार ३०१रु , तृतीय क्रमांक -श्री . तानाजी डवरी व अशोक पाटील २०१रु , उत्तेजनार्थ बाबूराव कापसे व रामचंद्र सातवेकर १०१रु .
या स्पर्धासाठी बक्षिसांची रक्कम श्री .पी डी मगदूम , सखाराम सावर्डेकर, गजानन गंगापूरे, पांडूरंग चांदेकर , पी .डी. माने ,यानीं देणगी रुपाने देऊन संघास आर्थिक सहकार्य केले . शेवटी संचालक श्री .एम.टी. सामंत यानीं आभार मानले .