वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून सीपीआरमध्ये अतिविशेष उपचार तज्ञांची बाह्यरुग्ण सेवा सुरु

कोल्हापूर, दि. 14 : सद्यस्थितीत मधुमेह, थायरॉइड व स्थूलता इत्यादी रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. या आजारांवर उपचार करण्या-या अतिविशेष उपचार तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याने वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून या आजारांवर उपचार करणा-या अतिविशेष उपचार तज्ञ डॉक्टरांची बाह्यरुग्ण सेवा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे मंगळवार … Read more

मुरगूडची व्यापारी नागरी सह. पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारी व राष्ट्रीय ” आदर्श पतसंस्था ” पुरस्कार मिळवलेली श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुरगूडच्या श्री . लक्ष्मी -नारायण नागरी सह . पतसंस्थेच्या सभागृहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. लक्ष्मी नारायण प्रतिमेचे पूजन श्री . तानाजी नाधवडेकर … Read more

लक्ष्मी मंदिर टेकडीजवळ कंटेनर मोटारची धडक

कागल : पुणे – बंगळूर महामार्गावर मोटार आणि कंटेनर या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. अपघातात मोटारचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. लक्ष्मी टेकडीच्या उतारावर ही दुर्घटना घडली. मुंबईतील एका कुटुंबातील काही सदस्य आजोबांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी मोटारने आंबोलीला चालले होते. लक्ष्मी टेकडीच्या उतारावर कार अचानक फास्ट … Read more

मुरगूडला अप्पर तहसिलदार कार्यालय मंजूर करा खास. संजय मंडलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता – कागल येथे अप्पर तहसिलदार कार्यालय मंजूर करावे अशी मागणी मुरगूड व परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी खास . संजय मंडलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की मुरगूड, बिद्री, कापशी , लिंगनूर या चार मंडल कार्यालयातील लोकांना कागल येथे आपल्या शासकीय कामकाजाकरीता जावे लागते. कागल पासून मुरगूड, … Read more

मुरगूड मध्ये स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवानिमित्त वीरांना वंदन !

” चित्रकला व निबंध स्पर्धेलाही उत्स्पूर्त प्रतिसाद “ मुरगूड ( शशी दरेकर ) – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मुरगूड नगरपालिकेच्यावतीने माझी माती माझा देश अभियान अंतर्गत शिला1 फलक अनावरण, पंच प्रण प्रतिज्ञा व वीरांना वंदन असे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. नगरपालिकेच्यावतीने येथील हुतात्मा तुकाराम चौकात स्वातंत्र्य सैनिक वारस विठ्ठल भारमल यांच्याहस्ते झेंडा वंदन करण्यात … Read more

मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात डॉ. एसआर रंगनाथन यांची जयंती साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड अंतर्गत महात्मा फुले ग्रंथालयामध्ये आज दि. ९ ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीस उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. टी.एच. सातपुते यांनी केले. त्यांनी डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या ग्रंथालय शास्त्राच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. … Read more

मेरी मिठ्ठी मेरा देश अंतर्गत मुरगूड नगरपरिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुरगुड ( शशी दरेकर ) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारोप अंतर्गत “मेरी मिठ्ठी ,मेरा देश” अर्थात “माझी माती, माझा देश “ या अभियाना अंतर्गत मुरगूड नगर परिषदेमार्फत दिनांक ११/०८/२०२३ रोजी हु.तुकाराम भारमल चौक येथे सकाळी ८.४५ वा. शिलाफलक अनावरण, सकाळी ९.०० वा. ध्वजारोहण कार्यक्रम आणि विश्वनाथराव पाटील खुले सभागृह या ठिकाणी सकाळी ९.१५ … Read more

वंदूर येथील ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिरामध्ये चोरी

सुमारे 6 लाख 60 रुपयांची चोरी कागल ( विक्रांत कोरे ) : वंदूर ता. कागल येथील ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिर मध्ये दहा किलो चांदी चा प्रभावळ व एक किलो चांदीचा मुकुट असे सुमारे सहा लाख साठ हजार रुपयांची चोरी झाली आहे. मूर्तीस चोरट्यांनी कोणत्याही प्रकारचा धका लावलेला नाही. ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर हे गावाच्या मध्यवर्ती … Read more

मुरगूड येथील श्री व्यापारी नागरी सह पतसंस्थेची वार्षिक सभा रविवारी १३ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल बाजारपेठ येथिल रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणारी विश्वसनिय श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ( फक्त सभासदा करीता ) रविवार दि. १३ ऑगष्ट रोजी दुपारी ठिक १ वाजता श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात भरविण्यात येणार आहे. सर्व सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर … Read more

मुरगूड येथील हुतात्मा तुकाराम भारमल वाचनालयात क्रांती दिन साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील हुतात्मा तुकाराम भारमल वाचनालयामध्ये क्रांती दिन साजरा करण्यात आला. प्रथम क्रांतीकारांच्या प्रतिमेचे पूजन श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री किरण गवाणकर व संतोष खराडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळून क्रांतीकारानां श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे सचिव एस व्ही … Read more

error: Content is protected !!