कागलच्या विकास आराखड्यासाठी साखर पेढे वाटणे म्हणजे अज्ञान आणि असमंजसपणाचा कळस – आम. हसन मुश्रीफ

कोणतेही काम आणि प्रयत्न न करता श्रेयासाठी स्टंटबाजी सुरू कागल, दि. २७ : कागलच्या विकास आराखड्यासाठी साखर पेढे वाटणे म्हणजे विरोधकांच्या अज्ञान आणि असमंजसपणाचा कळसच आहे, अशी टीका आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केली. कोणतेही काम आणि प्रयत्न न करता श्रेयासाठी विरोधकांकडून निवळ स्टंटबाजी सुरू असल्याचेही ते म्हणाले. कागल शहराचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला. त्यासाठीच्या प्रयत्न … Read more

स्वतः घडु या देश घडवु या – प्रा. तात्यासाहेब मोरे

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता.कागल येथील राजर्षी शाहु स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्राने प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक विधवांचा सन्मान केला. स्वतः घडुया देश घडवुया या व्याख्यानात बोलताना प्रा.तात्यासाहेब मोरे म्हणाले कृतज्ञता, आदर, दुसऱ्यासाठी जिव्हाळा लोप पावत चालला आहे,माया हवी. सन्मान हवा. प्रेमाची भुक हवी आहे. घरातून मानवी मुल्ये नष्ट होत आहेत.मानवी भावभावना सपाट होत आहेत. … Read more

मुरगूड येथे श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्था व जेष्ठ नागरीक संघाने ” प्रजासत्ताक दिन ” केला साजरा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथे भारतीय ७४वा प्रजासत्ताक दिन सुवर्णमहोत्सवी श्री. लक्षीनारायण सह. पतसंस्था व जेष्ठ नागरीक संघाच्या प्रांगणात मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सुवर्णमहोत्सवी श्री .लक्ष्मीनारायण सह .पतसंस्थेचे ध्वजारोहन संस्थेचे जेष्ठ संस्थापक संचालक मा. श्री . जवाहर मो . शहा यांच्या शुभहस्ते तर जेष्ठ नागरीक संघाचे ध्वजारोहन संचालक मा. … Read more

कागल येथे विराट सिटी मधील इमारतीच्या टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू

कागल(विक्रांत कोरे) : कागल येथे टेरेस वरून पडून तरुणाचा मृत्यू झाला असून इजाज दिलावर नायकवडी वय वर्ष 27 राहणार कागल असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत कागल पोलीस ठाण्यात नव्हती. ईजाज नायकवडी हा तरुण कागल बसस्थानका जवळील विराज सिटी येथील जिममध्ये व्यायामाला जात … Read more

मुरगूडच्या व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचा प्रजासत्ताक दिन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथील बाजारपेठेतील सर्वांच्या परिचयाची व सर्वदूर ख्याती असणारी श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन सेवानिवृत्त पोलिस श्री निवासराव पांडूरंग कदम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. भारतातील सर्व नागरीकानां त्यांच्या धर्म, संस्कृती, जात, लिंग आणि पंथ यांच्याशी संबंधीत समान अधिकार मिळावेत अशा पध्दतीची त्याची … Read more

देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे – संजयसिंह चव्हाण

देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे -मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण कोल्हापूर दि.25 (जिमाका) : युवा पिढी ही देशाची शक्ती आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येक युवकाने मतदार नोंदणी करुन घेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त श्री स्वामी … Read more

मुरगुड येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या प्रसाद व वास्तुशांती विविध धार्मिक विधी संपन्न

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या प्रासादिक वास्तू शांत सोहळ्याच्या आजच्या हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये कुमारिका पूजन पंचकन्या सवाष्ण पूजन विधी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते पार पडले. यानंतर मंदिर प्रांगणामध्ये गोमातेचे पूजन करण्यात आले. मंदिरावरती उभारण्यात येणाऱ्या कलशाचे धार्मिक विधी आणि … Read more

मुरगूड येथे गणेश जयंती उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल नवी पेठ येथे ९ / २ /१९९७ रोजी प्रतिष्ठापना झालेल्या ” आत्मरुप गणेश मंदीरात ” विविध धार्मिक कार्यक्रमानी गणेश जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी “श्री ” मूर्तीस दुग्धाभिषेक,गणेशायन व पालखी सोहळा मिरवणूक मोठया भक्तीमय वातावरणात व टाळ मृदूगांच्या तालात मोठया उत्साहात पार … Read more

सक्षम कुंभार झाला १ कोटीचा मानकरी

ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड मध्ये परत एकदा ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी ठरला. या आधी मुरगूड शहरात असाच एक १ कोटीचा मानकरी झाला असून मुरगूड शहरात हि दुसरी वेळ आहे १ कोटीचे बक्षीस जिंकण्याची. यावेळी सक्षम कुंभार हा विद्यार्थी ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी झाला आहे. … Read more

सिध्दी विनायक गणेश मंदिर – तुरंबे येथे आरोग्य शिबीर संपन्न

शहीद महाविद्यालय – पंत वालावलकर हॉस्पीटल – सोंळाकूर प्राथमिक केंद्राचा चा सहभाग गारगोटी (प्रतिनिधी) – येथे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे आणि पंत वालावलकर हॉस्पिटल, कोल्हापूर व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉडी मास इंडेक्स (बी एम आय) ,रक्तगट, सामान्य चिकित्सा आणि डोळे तपासणीचे शिबीर झाले. गणेश जयंती … Read more

error: Content is protected !!