बातमी

जिल्ह्यातील कोणकोणते रस्ते झाले बंद; अतिवृष्टीमुळे 28 मार्ग बंद

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

सदर माहिती दि. 24 जुलै सकाळी ९ वा. पर्यंत

कोल्हापूर, दि. 24 : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 8 राज्यमार्ग व 20 जिल्हामार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्पाचे समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यमार्ग– करवीर- कोल्हापूर शहरा बाहेरील वळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पासून शाहू नाका, कळंबे साळुंखे नगर, बालिंगे,शिंगणापूर, चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 204 वडणगे निगवे दुमाला सीए महामार्ग क्रमांक 4 ला मिळणारा ते एमआयडीसी पुल क. बावडा शुगरमिल जवळून कदमवाडी, मार्केट यार्ड, ताराराणी पुतळा ते शाहूनाका उजळाईवाडी ते विमानतळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 रस्ता रामा 194 वर शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतुकीस बंद पर्यायी आंबेवाडी चिखली मार्गे वाहतूक सुरु.

चंदगड – चंदगड, इब्राहिमपूर, चितळे, शृंगारवाडी, आजरा, बुरुडे, होणेवाडी, महागाव, वैरागवाडी, हासुर, सासगिरी, नरेवाडी, हलकर्णी, खानापूर जिल्हा हद्दीपर्यंत रामा क्रमांक 201 इब्राहिम पूल (घटप्रभा नदी) येथे 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून रामा 180 ते कानुर कुरणी गवसे अडकुर रस्ता प्रजिमा 66 ते रामा 189 मार्गे वाहतूक सुरु.

हातकणंगले- पन्हाळा, वाघबीळ, बोरपाडळे, वाठार तर्फे वडगाव हातकणंगले, इचलकरंजी, शिरदवाड, शिवनाक वाडी राज्य हद्दीपर्यंतचा राज्यमार्ग क्रमांक 192 वर पंचगंगा नदीवरील लहान पुलाला पाणी घासत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव लहान पूल वाहतुकीस बंद पर्यायी पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून वाहतूक सुरु.

चंदगड- कोल्हापूर, गारगोटी, गडहिंग्लज, नागनवाडी, चंदगड, हेरे, तिलारी रस्ता रामा 189 वर चंदगड पुलावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. रामा 189 ते प्रजीमा 76 पाटणे फाटा मार्गे रामा 180 वरून हलकर्णी फाटा दाटे मार्गे चंदगड मार्गे वाहतूक सुरू.

गडहिंग्लज – गडहिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, गडहिंग्लज, नसेर, नागणवाडी रस्ता राज्यमार्ग क्र. 189 वर हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर 1 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून गडहिंग्लज-बेळगुंदी इंचनाळ गजरगावं महागांव नेसरी प्रजिमा 83 मार्गे वाहतूक सुरु.

गगनबावडा – कोल्हापूर, चिखली, वरणगे पाडळी, येवलूज, काटेभोगाव, बाजार भोगाव रस्ता राज्यमार्ग क्रमांक 193 वर पुराचे 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. पोहालवाडी मार्गे बाजार भोगाव वाहतूक सुरू.

पन्हाळा- कोल्हापूर, चिखली, येवलुज, बाजार भोगाव, करांजफेन, अनुस्कुरा रस्ता रामा 193 वर पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद. पर्यायी मार्ग राजापूरला जाण्यास मलकापूर, मांजरे, अनुस्कुरा, राजापूर मार्गे वाहतूक सुरु.

पन्हाळा- कोल्हापूर, चिखली, येवलुज, बाजार भोगाव, करांजफेन, अनुस्कुरा रस्ता रामा 193 वर पुराचे 3 फूट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद. पर्यायी मार्ग पोहालवाडी मार्गे बाजारभोगावत मार्गे वाहतूक सुरु.

राधानगरी- देवगड निपाणी कलादगी रस्ता राज्यमार्ग क्रमांक – 178 वर पुराचे पाणी निढोरी ते मुरगूड दरम्यान वेदगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद. पर्यायी मार्ग मुरगड, चिमगाव, मडिलगे मार्गे मुदाळ तिट्टा मार्गे वाहतूक सुरु

चंदगड – वेंगुर्ला बेळगाव बेल्लारी रामा क्रमांक 180 (दाटे गावाजवळ) येथे 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून रामा 180 ते तांबूळवाडी, बगीलगे, मागणांव इजिमा 191 ते सोनारवाडी आमरोली ते रामा 189 मार्गे वाहतूक सुरु.

प्रमुख जिल्हामार्ग-

आजरा- प्रजिमा 52 पासून नवले, देव कांडगाव, कोरीवडे, पेरणोली, साळगाव रामा क्रमांक 188 ला मिळणारा प्रजिमा क्रमांक 58 वर हिरण्यकेशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद पर्यायी मार्ग बाचणी पेरणोली मार्गे वाहतूक सुरू.

शिरोळ- चिंचवड, शिरोळ, कुरुंदवाड, बस्तवाड, अकीवाट, खिद्रापूर रस्ता प्रजिमा 123 वर शिरोळ केटी वेअर वर 2 फूट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद पर्यायी मार्ग शिरोळ कुरुंदवाड रामा 153 मार्गे वाहतूक सुरु.

गगनबावडा- रामा 193 पासून बाजार भोगाव, किसरूळ, काळजवडे, पोंबरे, कोलिक पडसाळी ते काजींर्डा घाटात मिळणारा जिल्हा हाद्दीपर्यंत प्रजिमा क्रमांक 19 वर मोरीवर पाणी आल्याने वाहतूक बंद पर्यायी मार्ग नाही.

चंदगड- रामा क्रमांक 180 पासून कानूर, कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, अडकुर रामा क्रमांक 189 ला मिळणारा प्रजिमा क्रमांक 66 वर पुलावर 2 फूट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद रामा 180 ते कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, अडकूर मार्गे वाहतूक सुरू.

गगनबावडा- रामा क्रमांक 177 पासून परखंदळे, आकुर्डे, हारपवडे, गवशी, धुंदवडे, जर्गी, गारिवडे, गगनबावडा रामा क्रमांक 177 ला मिळणारा प्रजिमा क्रमांक 39 वर गोठे पुलावर 4 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद, पर्यायी मल्हार पेठ, अम्बर्डे मार्गे वाहतूक सुरु.

गडहिंग्लज- रामा क्रमांक 188 ते निलजी, नूल, प्रजिमा 56 ते प्रजिमा 57 पासून येणेचवंडी, नंदनवाड रामा 201 ला मिळणारा प्रतिमा 86 वर निलजी बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी जरळी, दुंडगे, हसुरचंपू मार्गे वाहतुक सुरु.

कागल – रामा क्रमांक 178 वर सोनगे, बस्तवडे, कौलगे, चिखली, खा. कुर्ली राज्यहद्द क्र. 47 वर वेदगंगा पुलावर 2 फूट पाणी आल्याने रस्ता बंद रामा 178 देवगड, राधानगरी, मुरगुड, निपाणी रोड व प्रजीमा क्रमांक 46 बिद्री, सोनाळी, बस्तवडे रोड कडून वाहतूक सुरु.

गगनबावडा- अंदुर, मंदूर, तांदुळवाडी, गोठे प्रजिमा 25 वर मोरीवर पुराचे 2 फूट पाणी असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद पर्यायी मार्ग नाही.

चंदगड- गुडवले, हेरे, सावर्डे, नांदवडे, करंजगाव, हलकर्णी रस्ता प्रजीमा 71 वर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद प्रजिमा 71 ते करंजगाव ग्रामा 95 ते प्रजिमा 76 ते रामा 189 मार्गे हेरे, सावर्डे, नांदवडे प्रजिमा 71 मार्गे वाहतूक सुरु.

करवीर- प्रजिमा क्रमांक 27 पासून कुडित्रे, कोगे, महे, देवाळे, दिंडनेर्ली, नंदगाव प्रक्र. 28 वर कोगे पुलावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी मार्ग कुडित्रे कारखाना, सांगरुळ, मारुळ, एमडीआर 29 बीड फाटा व एमडीआर 29 बालिंगा ते कोगे वाहतूक सुरु.

गगनबावडा- कोपार्डे, पडळ, माजगाव रस्ता प्रजिमा क्रमांक 18 वर माजगाव पुलाच्या अप्रोच रस्त्यावर पुराचे 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. पर्यायी मार्ग आंबेवाडी, चिखली, येवलुज, पडळ मार्गे वाहतूक सुरु.

गडहिंग्लज – अर्जुनवाडी, कानडेवाडी, सांबरे रस्ता प्रजिमा 64 वर घटप्रभा नदीवरील कानडेवाडी बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद. पर्यायी मार्ग नेसरी प्रजिमा क्रमांक 61 वरून हडलगे सांबरे मार्गे वाहतूक सुरु.

पन्हाळा – राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ पासून शिराळे, येळवडी, सावर्डे, इंजोली ते कोलीक प्रजीमा 19 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्रमांक 117 वर पाणी आल्याने रस्ता बंद. पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.

करवीर- रामा क्र. 193 येवलूज, दोनवडे ते रामा 177 पुढे बालिंगे, महे पाटी, बीड, शिरोली, सडोली दुमाला, चाफोडी, गर्जन, कोते, चांदे, धामोड, शिरगाव, तारळे, खु. पाडळी, कारीवडे, ओलवन, तारळे खुर्द, कसबा तारळे, पिरळ, पाडळी, कारीवडे, दिगस, ओळवन ते रामा क्र. 178 ला मिळणाला प्रजिमा 29 वर महे पुलाच्या स्लॅपवर पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी मार्ग सांगरुळ, म्हारुळ, बीडशेड मार्गे सुरु.

करवीर- प्रजिमा क्रमांक 29 पासून शिरोली दुमाला, बाचणी, सडोली खा., हळदी कुर्डू, इर्स्फुली, नागाव, नंदगाव एकोंडी, व्हनुर ते रामा क्रमांक 195 ला पिंपळगाव नजीक मिळणारा प्रजिमा क्रमांक 37 वर बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद. पर्यायी कांचनवाडी हसुर, सडोली बाचणी मार्गे वाहतूक सुरू.

चंदगड- रामा 180 ते कानूर, कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, अडकुर रस्ता प्रजिमा 66 वर नांदुरे पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद रामा 180 ते कुरणी, गौसे, इब्राहिमपूर, अडकूर प्रतिमा 66 मार्गे वाहतूक सुरु.

शाहुवाडी- येळाणे कोपार्डे शिरगांव सवते शिंपे सरूड प्रजिमा – 4 वर शिरगांव मठ ते सवते येथे रस्त्यावर 2 फूट पाणी आलेमुळे रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी मार्ग- येळाणे शाहूवाडी, बांबवडे, सरूड मार्गे वाहतूक सुरू.

करवीर- रामा क्रमांक 196 पासून वडकशिवाले बाचणी साके सावर्डे प्रजीमा क्रमांक 42 वर दूधगंगा नदीवर बाचणी धरणावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद पर्यायी मार्ग इस्पुर्ली, नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणी मार्गे वाहतूक सुरू.

चंदगड- गुडवले हेरे सावर्डे नांदवडे करंजगाव हालकर्णी रस्ता प्रजिमा 71 वर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद, प्रजीमा 71 ते करंजगांव ग्रामा 95 ते प्रजीमा 76 ते रामा 189 मार्गे हेरे सावर्डे नांदवडे प्रजीमा 71 मार्गे वाहतूक सुरू.

चंदगड- पाटणे फाटा ते माणगांव शिवणगे निट्टूर कोवाड प्रजीमा 67 वर माणगांव पुलावर 2 फूट पाणी आलेने वाहतूक बंद. पर्यायी मार्ग – रामा 180 ते तांबूळवाडी बगीलगे माणगांव इजिमा 191 ते शिवणगे कोवाड प्रजीमा 67 मार्गे वाहतूक सुरू.

One Reply to “जिल्ह्यातील कोणकोणते रस्ते झाले बंद; अतिवृष्टीमुळे 28 मार्ग बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *