बातमी

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 116.2 तर हातकणंगलेमध्ये सर्वात कमी 17.5 मिमी पाऊस

दि. 27/07/2023. दुपारी 3:00 वा. राजाराम बंधारा पाणी पातळी 40ʼ08”(542.58m)
विसर्ग : 60446 cusecs (पंचगंगा नदी इशारा पातळी 39’00” व धोका पातळी – 43’00”) एकुण पाण्याखालील बंधारे -: 82

कोल्हापूर, दि. 27 : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 116.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 17.5 मिमी, शिरोळ -24.4, पन्हाळा- 36.1, शाहूवाडी- 57.1 मिमी, राधानगरी- 43.3 मिमी, गगनबावडा- 116.2, करवीर- 20 मिमी, कागल- 18.6, गडहिंग्लज-29 मिमी, भुदरगड- 55.1, आजरा-49.6 मिमी, चंदगड- 37.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 4, 5, 6 व 7 उघडले आहेत. त्यामधून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

 • पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.
 • भोगावती नदीवरील – शिरगाव, तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
 • कासारी नदीवरील – यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कंटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण व कुंभेवाडी.
 • हिरण्यकेशी नदीवरील – सुळेरान, दाभीळ, साळगांव, चांदेवाडी, ऐनापूर, हरळी, गिजवणे, निलजी व खणदाळ.
 • घटप्रभा नदीवरील – पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानर्डे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी.
 • वेदगंगा नदीवरील – निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, गारगोटी, म्हसवे व शेणगांव.
 • कुंभी नदीवरील – कळे, शेनवडे, वेतवडे, मांडूकली, सांगशी व असळज.
 • वारणा नदीवरील – चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली, खोची, शिगांव व मांगले सावार्डे.
 • कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे व सरुड पाटणे.
 • ताम्रपर्णी नदीवरील – कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकरे, न्हावेली, कोवाड, माणगांव व ढोलगरवाडी.
 • दुधगंगा नदीवरील – दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली व बाचणी.
 • धामणी नदीवरील – सुळे व आंबर्डे.
 • तुळशी नदीवरील – बीड व आरे. असे 81 बंधारे पाण्याखाली आहेत.

पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 40.5 फूट, सुर्वे 38.8 फूट, रुई 68.9 फूट, इचलकरंजी 63.6, तेरवाड 56.5 फूट, शिरोळ 50.6 फूट, नृसिंहवाडी 50.6 फूट, राजापूर 38.4 फूट तर नजीकच्या जिल्ह्यातील सांगली 18.9 फूट व अंकली 24.10 फूट अशी आहे.

जिल्हयातील धरण पाणीसाठा
कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 7 च्या नोंदीनुसार धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसी मध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे.

राधानगरी – 8.30 (8.361 टी. एम. सी), तुळशी 1.91 (3.471 टी. एम. सी), वारणा 28.93 (34.399 टी. एम. सी), दुधगंगा 14.92 (25.393 टी. एम. सी), कासारी 2.28 (2.774 टी. एम. सी), कडवी 2.41 (2.516), कुंभी 2.25 (2.715 टी. एम. सी), पाटगाव 2.78 (3.716 टी. एम. सी), चिकोत्रा 0.90 (1.522 टी. एम. सी), चित्री 1.43 (1.886 टी. एम. सी), जंगमहट्टी 1.02 (1.223), घटप्रभा 1.56 (1.560), जांबरे 0.82 (0.820 टी. एम. सी ) आंबेओहोळ 1.01 (1.240 टी. एम. सी ) आणि कोदे ल. पा. 0.21 (0.214).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *