मुरगूडमध्ये लखीमपुर येथील शेतकरी हत्याकांडाचा जाहीर निषेध

मुरगूड ( शशी दरेकर ) : उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याने गाडीखाली चिरडून मारण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना अतिशय निंदणीय आणि तीव्र चीड आणणारी आहे. मुरगुडची स्वाभिमानी जनता या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. भाजपच्या या निर्दयी मंत्र्यांचा जाहीर निषेध. सदर घटनेचा निषेध … Read more

Advertisements

शाहू साखर कारखाना देणार एकरकमी एफ आ पी – समरजितसिंह घाटगे

एकरकमी एफ आर पी देण्याची घोषणा करणारा राज्यातील पहिला कारखाना कागल(प्रतिनिधी): येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम -२०२१-२०२२ साठी एफ आर पी ची होणारी २९९३/- रूपये इतकी रक्कम एकरकमी देणार आहे.अशी घोषणा चेअरमन समरजीतसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केली.या हंगामातील एफ आर पी ची रक्कम एक रकमी देण्याचा निर्णय जाहीर करणारा शाहू … Read more

बामणी येथील मॅरेथॉन स्पर्धेत साहिल मगदूम प्रथम

सिद्धनेर्ली,ता.४ः बामणी ता कागल येथील मॅरेथॉन स्पर्धेत साहिल जयराम मगदूम याने प्रथम क्रमांक पटकाविला. विवेक बाबुराव कांबळे व यश विठ्ठल पवार यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.

कालवा अकॅडमी मार्फत या स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या स्पर्धकांना उपसरपंच तानाजी मगदूम, शिवाजी मगदूम, बाबुराव मगदूम, अरविंद बाबर आदींच्या हस्ते बक्षीस वितरण केले. स्पर्धेचे संयोजन स्वप्निल बाबर, आदेश पाटील, पांडुरंग मगदूम ,अनिकेत मगदूम, भारत पाटील,रोहित पाटील यांनी केले.

मुरगूडच्या ” जान्हवी सावर्डेकर ” हिने राज्यपॉवरलिप्टींग अजिंक्यपद स्पर्धत पटकावली चार सुवर्णपदके

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धसाठी निवड मुरगूड (शशी दरेकर) : औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोशिएशनच्या सब-ज्युनियर, ज्युनियर , सिनियर व मास्टर्स I ते IV (पुरुष व महिला) बेंचप्रेस (इक्विण्ड अण्ड अनइक्विण्ड) अजिंक्यपद स्पर्धत येथील जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने तब्बल ४ सुवर्णपदके पटकावली आहेत. तिची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धसाठी निवड झाली आहे.महाराष्ट्र … Read more

महाराष्ट्र एसटीला कर्नाटकात प्रवेश द्या – शिवसेनेचे निपाणी सीपीआय शिवयोगी यांना निवेदन

साके (सागर लोहार) : कर्नाटक निपाणी सीमा भागात असलेल्या महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील हमिदवाडा, कौलगे, बस्तवडे, चिखली,लिंगनूर,मुरगुड,गलगले, अर्जुनी, ही गावे निपाणी ला लागून आहेत. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असलेल्या गावातील नागरिक व्यापारी शालेय विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटक असा प्रवास करत असतात. पण गेल्या काही दिवसापासून कर्नाटकचे पोलीस इथे थांबत असल्याने या मार्गावरून मुरगुड – निपाणी एसटी … Read more

आमच्या आघाडीच्या विजयाचे महाद्वार कागलमधून उघडणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागलमध्ये मंडलिक गट, मुश्रीफ गट व संजयबाबा घाटगे गटाच्या ठरावधारकांचा संयुक्त मेळावा उत्साहात कागल, दि.१०:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होईल. आमच्या आघाडीच्या विजयाचे महाद्वार कागलमधून उघडणार, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून बँकेचा कारभार सातत्याने राजकारणविरहित केला, असेही ते म्हणाले. कागल तालुक्यातील मंडलिक गट, मुश्रीफ … Read more

व्यापारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

मुरगड (शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथील मुख्य बाजारपेठेतील नागरिकांच्या जिव्हाळ्याची पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था शाखेच्या मुदाळतिट्टा तालुका भुदरगड येथील नूतन इमारतीचे चेअरमन श्री किरण गवाणकर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले यावेळी कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर या उभयतांच्या शुभहस्ते सत्यनारायण पूजा पार पडली. संस्थेच्या मुख्य इमारती सह सर्व शाखा … Read more

शिंदेवाडीमध्ये शिवसेनेच्या युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिंदेवाडी ता- कागल येथे शिवसेनेच्या युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन अॅड .विरेंद्र मंडलीक यांच्या हस्ते झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सौ. रामेश्वरी खराडे होत्या. यावेळी अॅड .विरेंद्र मंडलीक म्हणाले, अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी युवा सेनेचे व्यासपीठ उपलब्ध असुन युवकांनी अन्यायाविरूद्ध लढुन समाजाच्या सेवेसाठी कटीबद्ध राहावे. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहीती तळागाळापर्यंत पोचवावी. यावेळी पुंडलिक खराडे, पांडुरंग ढेरे, राहुल खराडे, रवी शिंदे, ओंकार खराडे, सागर शिंदे, संदीप कलकुटकी, शुभम चौगले, विनायक खराडे, नंदू ढेरे, नेताजी शिंदे, विजय शिंदे, विनायक शिंदे, विष्णू मोरबाळे, विलास पोवार, आनंदा कदम, सचिन खराडे, वसंत ढेरे, परशुराम मोरबाळे ,शिवाजी खराडे ,संतोष खराडे, तानाजी खराडे, एकनाथ पोवार, दिलीप शिंदे, पी.बी.खराडे ,उत्तम खराडे, सतीश खराडे, संभाजीराव खराडे, निखिल खराडे, अनिल शिंदे, हरी शिंदे, साताप्पा शिंदे, सुकुमार शिंदे यांच्यासह तरूण वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. स्वागत ग्रामपंचायत सदस्य अजित मोरबाळे यांनी केले. तर बालाजी सहकार ग्रुपचे संस्थापक रवींद्र ढेरे यांनी प्रास्ताविक केले. तर आभार रवींद्र जालिमसर यांनी मानले.

सर्वांगसुंदर कागल शहर नेहमीच नंबर वन असेल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

शहराच्या विस्तारित क्षेत्राचा सिटीसर्वे प्रारंभ

कागल : राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेले कागल शहर सर्वांग सुंदर आहेच. स्वच्छता, विकास आणि सोयी सुविधांच्या बाबतीत ही कागल शहर राज्यासह, देशात नेहमीच नंबर वन असेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल शहराच्या विस्तारित क्षेत्राच्या सिटी सर्वे योजनेचा प्रारंभ मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शहरातील आठ ओपन जिमचे लोकार्पण व स्वतःच्या मालकीच्या जागेवर वैयक्तिक नवीन घरकुल बांधकाम करणे, केंद्रशासनाच्या पहिल्या अनुदानाचे वाटप हे कार्यक्रम ही झाले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, वाढत्या शहरीकरणाचा प्रश्न सबंध महाराष्ट्रभर आहेत, परंतु स्वच्छता विकासकामे आणि सोयीसुविधांच्या पुरवठ्यामुळे तो कागलमध्ये सुटलेला दिसतो, ही चांगली गोष्ट आहे. भुमिअभिलेखचे उपसंचालक किशोर तवरेज म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रभर खेड्या-पाड्यातील सिटीसर्वे करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ग्रामविकास विभागाने हाती घेतला आहे. त्यामुळे ६ लाख कोटी रुपयांची तरलता निर्माण होणार आहे. कागलच्या या प्रकल्पामुळे २०० कोटी रुपयांची तरलता निर्माण होईल. माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घराचा दरवाजा जनतेसाठी सदैव उघडा असतो. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही त्यांच्या कार्यालयाचा दरवाजा सदैव उघडा ठेवून एक चांगला आदर्श घालून दिला आहे. जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे अनुकरण करावे. त्यामुळे जनतेलाही दरवाजाबाहेर ताटकळत राहावे लागणार नाही आणि कामांचा निपटारा ही जलद गतीने होईल. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले ॲड. संग्राम गुरव म्हणाले, दोन वर्षांपूर्वी मी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षात आलो. त्याआधीची तीन वर्षे लीडरशिप कशी नसावी याची अनुभूती देणारी तर अलीकडची दोन वर्ष लीडरशिप कशी असावी याची अनुभूती देणारी ठरली आहेत.

मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले,
🟠 अत्याधुनिक ड्रोन व रोव्हर्सद्वारे अचूक व जलद विस्तारित क्षेत्रातील मिळकतीचे मोजमाप, नकाशा व मिळकत पत्रिका मिळणार आहेत.
🟠 सर्वेक्षणातून प्रत्येक घराचा नकाशा, सीमा व क्षेत्र यांची माहिती मिळणार आहे.
🟠 मालमत्तेचा अधिकार पुरावा, मिळकतपत्रिकेच्या स्वरूपात मिळणार आहे.
🟠 कर्ज उपलब्धता विविध, आवास योजनाची मंजुरी, जागेची मालकी हक्क, तंटे – वाद उद्भवणार नाहीत.
🟠 जमिनी, खरेदी – विक्री, व्यवहारातील फसवणूक टाळणे सोपे होणार आहे.

यावेळी व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, प्रांताअधिकारी सुशांत बनसोडे, भूमीअभिलेख पुणे जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव, तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, उपाधिक्षक सौ.सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, नगरसेवक सतीश घाडगे, संजय चितारी, सौ माधुरी मोरबाळे, सौ पद्मजा भालबर, सौ शोभा लाड, सौ जयश्री शेवडे, सौ नुतन गाडेकर आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत पांडुरंग पोटे यांनी केले. प्रास्ताविक नगरपालिकेचे पक्षप्रतोद नितीन दिंडे यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार नगरसेविका सौ.मंगल संग्राम गुरव यांनी मानले.


निराधार लाभार्थीच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूरमध्ये निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप कोल्हापूर : गोरगरीब सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद आहे. गोरगरीब निराधारच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जोपर्यंत या जनतेचे आशीर्वाद पाठबळ आणि परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी असे सामाजिक कार्य करून समाजातील शेवटच्या घटकाला शोधून … Read more

error: Content is protected !!