बातमी

‘अन्नपूर्णा’ च्या वतीने गैबीपीराला गलेफ अर्पण – माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह कुटूंबियांची उपस्थिती

साके : सागर लोहार

दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या कागल येथील ग्रामदैवत
हजरत गैबीपीर दर्गाच्या ऊरूसानिमित ‘अन्नपूर्णा’ शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड केनवडे या कारखान्याच्या वतीने चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे व गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते संचालकांच्या उपस्थितीत गलेफ अर्पण करण्यात आला. अन्नपूर्णा कारखाना व घाटगे कुटुंबियांच्या वतीने या गलेफाचे आयोजन करण्यात आले होते. काल बुधवारी सकाळी ११ वाजता गहिनीनाथ गैबीपीराला विधीवत गलेफ अर्पण केला.

यावेळी अंबरिषसिंह घाटगे यांनी कोरोना संसर्गाच्या महामारीचे जगावरचे संकटं दुर व्हावे. शेतकऱ्यांच्या जीवनात सुख शांती मिळावी व पूर्ववत जीवन सुखासमाधानाने जगायला मिळू देत अशी मनोभावे प्रार्थना केली. यावेळी सुभाष करंजे,एम. बी .पाटील, शिवसिंह ग घाडगे, दत्तोपंत वालावलकर, विश्वास दिंडोरले, दिनकर पाटील, वाय. टी .पाटील, तानाजी पाटील , राजेश भराडे, धनाजी गोधडे, विलास पवार, महेश देशपांडे, के.के.पाटील, बाळासाहेब पाटील, दिपक चौगले, विजय जाधव, बंडा माने, अरुण तोडकर, वैभव अडके तसेच कारखान्याचे संचालक व कार्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *