बातमी

निढोरीतील युवकांचा नववर्षाच्या स्वागतासाठी अनोखा उपक्रम

मुरगूड (शशी दरेकर) : नववर्षाचे स्वागत अलिकडची तरुण पिढी ३१ डिसेंबरच्या रात्री दारू, रस्सा पार्ट्या, बियर, डिजे, नाचगाणी ,धिंगाणा, नशा करून करत असते. पण निढोरी ता. कागल येथील तरुणांनी नववर्षाचे स्वागत शिये ता.करवीर, जिल्हा कोल्हापुर येथील करुणालय बालगृह येथे अनाथ एचआयव्हीग्रस्थ बालकांसोबत सहभोजनाचा आस्वाद घेत, बाविद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करत, केक कापून केले. त्यामुळे या नव्या संकल्पनेच नागरिकांकडून स्वागत होत आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एनजीओ समितीचे अध्यक्ष युवराज येडुरे होते. कार्यक्रमाचे स्वागत करूणालय बालगृहाचे सर्वेसर्वा आनंद बनसोडे तर प्रास्ताविक स्वराज्य निर्माण संस्थेचे संस्थापक संदिप बोटे यांनी केले.
आईवडीलांनी क्षणिक सुखाच्या मोहापायी केलेल्या चुकांमुळे जन्मतःच जर एखाद्या बालकाला एचआयव्हीची लागण होवून दुर्दैवी कालचक्रात आयुष्य हरवून बालपणच कोळमेजणार असेल तर या सगळ्यात त्या चिमुकल्या बाळांचा दोष तरी काय? हा प्रश्न मनाला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही.आपण कोणाच्या पोटी जन्म हे आपल्या हातात असते तर कदाचित या एचआयव्हीग्रस्थ मुलांनी निरोगी बापाच्या /आईच्या पोटीच जन्म घेतला असता.पण आपल्याकडे तशी व्यवस्थाच नाही.त्यामुळे अशा निष्पाप,निरागस मुलांच्या वाट्याला आलेलं काटेरी जीवन फुलवण्यासाठी त्यांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा येऊ न देता त्यांना समानतेची, आपुलकीची आणि मायेची ऊब देण्याची गरज आहे .असा जनजागृती संदेश देण्यासाठीच आम्ही नववर्षाचे स्वागत या बालकांसोबत करत असल्याची भावना या तरूण कार्यकर्त्यांतुन व्यक्त होत होत्या.

या कार्यक्रमाच्या दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे व शाश्वत विकास चळवळीचे युवाविभाग प्रमुख विकास सावंत या युवा कार्यकर्त्यांचा वाढदिवस संपन्न झाला.अनाथ एचआयव्हीग्रस्थ मुलांच आयुष्य हे दुर्दैवीच आहेच. पण हे कटुसत्य स्वीकारुन,त्यांच्या आरोग्याची काळजी घेत,दर्जेदार शिक्षणातूनच या बालकांचे आयुष्य समृद्ध होवू शकतो.या एचआयव्हीग्रस्थ अनाथ बालकांना शिक्षणानेच जगण्याची नवी ओळख मिळू शकते.यासाठीचं या बालकांना वह्या,पेनचे वाटप व युवकांचे आयडॉल असणाऱ्या स्वामी विवेकानंदांची प्रतिमा भेट देऊन नववर्षाचे स्वागत करत असल्याचे विकास सावंत यांनी बालकांचे मनोबल वाढविणाऱ्या आपल्या मनोगतात सांगितले.

समाजातील कोणत्याही शारिरीक विकलांग,उपेक्षित व निराधार असणाऱ्या व्यक्तींना हिन दर्जाची किंवा तुसडेपणाची वागणुक न देता त्यांना समानतेची वागणुक देण्याचा,त्यांना मदत करण्याचा व त्यांच्या सामाजिक न्यायासाठी प्रयत्नशील राहण्याचा नववर्ष संकल्प संताची शुगरचे डिस्टलरी मॅनेजर संतोष मोरबाळे यांनी युवकांना दिला.

या कार्येक्रमासाठी महाराष्ट्र राज्य एनजीओ समितीचे राज्याचे अध्यक्ष युवराज येडुरे,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे व शाश्वत विकास चळवळीचे युवाविभाग प्रमुख विकास सावंत,संताजी शुगरचे डिस्टलरी मॅनेजर संतोष मोरबाळे,स्वराज्य निर्माण संस्थेचे संस्थापक संदिप बोटे,संताजी शुगरचे सिनीयर केमिस्ट प्रदिप माळकर साहेब इत्यादी मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत उपस्थितांना संबोधित केले.

या उपक्रमामध्ये विकास सावंत,ओंकार कांबळे,सिध्देश डवरी,धिरज कांबळे,सुरज कांबळे,प्रथमेश बुगडे, सुनिल गुरव,मनोज माने,ओंकार सुतार प्रणव मगदूम, सनी कांबळे,आर्णव कांबळे या युवकांनी पुढाकार घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल गुरव यांनी केले तर आभार सुरज कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *