मुरगूडच्या लिटील मास्टर गुरुकुलचे शैक्षणिक कार्य आदर्शवत – वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी

लिटल मास्टर गुरुकूलम मुरगूडचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न मुरगुड ( शशी दरेकर ) : लिटील मास्टर गुरुकुलम् मुरगूड या संस्थेचे शैक्षणिक कार्य आदर्शवत व-संस्कारक्षम विद्यार्थी घडवणारे असून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू बनवणारे आहे असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सूर्यवंशी यांनी केले. ते लिटील मास्टर गुरुकुलम् संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी … Read more

Advertisements

‘अन्नपूर्णा,ची केमिकल फ्री जॅगरी पावडर बेंगलोरला पाच हजार किलोची पहिली ऑर्डर रवाना : अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते शुभारंभ

व्हनाळी : सागर लोहार केनवडे तालुका कागल येथील श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स या कारखान्यांमध्ये तयार झालेली आरोग्यदायी केमिकल फ्री जॅगरी पावडर बेंगलोर च्या मार्केट मध्ये पाठवण्यात आली. गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते, अन्नपूर्णा चे चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जॅगरी पावडर १ किलो च्या रिटेलिंग पाउच पॅकिंग पोत्यांचे पूजन … Read more

मुरगुड ता. कागल येथे महावितरणच्या उपविभागीय  कार्यालयात कृषी ग्राहकांचा मेळावा उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : कृषी धोरण २०२० अंतर्गत  शेती पंप ग्राहकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी महावितरणने या ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते.  मेळाव्याचे नियोजन उपविभाग प्रमुख  हेमंत येडगे, उपकार्यकारी अभियंता यांनी केले. सदर मेळाव्यास ३००  पेक्षा जास्त कृषी पंप ग्राहक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून माहिती घेत चर्चेत सहभाग घेतला. सदर मेळाव्यात बिल … Read more

मुरगूडच्या शिवाजी विद्यामंदिर शाळा नंबर 2 च्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी जीवन भोसले तर उपाध्यक्षपदी आश्वीनी सचिन गुरव यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) मुरगूड येथील शिवाजी विद्यामंदिर च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी : जीवन भोसले यांची तर उपाध्यक्षपदी सौ. आश्वीनी सचिन गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष श्री सुनील घाटगे तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक प्रविण आ़ंगज आनिल बोटे होते. यावेळी इतर सदस्य श्री विजय मेंडके, फौजी निशांत … Read more

परीक्षक, नियामक व पर्यवेक्षक यांच्या भत्त्यात वाढ व्हावी मागणी

कागल /प्रतिनिधी : परीक्षक, नियामक व पर्यवेक्षक यांच्या भत्त्यात वाढ व्हावी मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळ कोल्हापूर यांना नुकतेच देण्यात आले. बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत. शिक्षकवर्ग आपले काम प्रामाणिकव अविरत पणे पार पाडत आहे. परंतु त्याचा मोबदला म्हनावा तितका दिला जात नाही. ही शिक्षक वर्गातील शोकांतिका … Read more

वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून रंगभरण स्पर्धा व खाऊ वाटप

सेवानिवृत्त शिक्षकाचा आगळा-वेगळा अपक्रम मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक श्री. हेमंत पोतदार हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त खर्चाला फाटा देत विविधी सामाजिक उपक्रम राबवत असतात यावेळी त्यांनी मुरगूडमधील जीवन शिक्षण विद्यामंदीर, कन्या विद्या मंदीर, व लिटल मास्टर गुरूकुलम् या शाळेमधील मुलानां खाऊचे वाटप केले तर ते पुर्वी शिक्षक म्हणून कार्यरत … Read more

गुंठेवारी खरेदी-विक्री सुरु करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे मुरगूड मधील शेतकऱ्यांची मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड,ता.११ : ऑगस्ट २०१९ पासून राज्य शासनाने जमीन खरेदी विक्रीबाबत अनेक प्रकारच्या जाचक अटी घातल्यामुळे गुंठेवारी खरेदी – विक्री व्यवहार बंद आहेत. परिणामी त्याचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसत आहे. यासाठी शासनाने तात्काळ ही गुंठेवारी खरेदी – विक्री सुरु करावी. या मागणीचे निवेदन मुरगूडमधील जमीनधारकांनी आमदार प्रकाश आबिटकर … Read more

मुरगूडमध्ये शिवप्रेमीतर्फे स्व. सदाशिवराव मंडलिक यांना विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल बाजारपेठ शिवप्रेमीतर्फे लोकनेते स्व . सदाशिवराव मंडलिक यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रथम स्व. मंडलिक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन श्री. मधूकर मंडलिक ( गुरुजी ) यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळून लोकनेते मंडलिक साहेबानां श्रद्धांजली वाहण्यात आली. … Read more

लोकनेते मंडलिक यांच्या स्मृतिदिनानिमित्य उद्या विविध उपक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : हमिदवाडा ता. कागल येथिल सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा सातवा स्मृतिदिन उद्या गुरुवार दि. १o रोजी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर विविध उपक्रमानी साजरा होत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सागर देशपांडे उपस्थित राहणार आहेत. तर बाबासाहेब यशवंत पाटील (सरूडकर … Read more

फोन टॅपिंग व ब्लॅकमेलिंगसाठी IPS रश्मी शुक्लांचा वापर कुणी केला? – नाना पटोले

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करुन विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचे पाप देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरु झाले. वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केले हे सिद्ध झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे परंतु त्यांना टॅपिंगचे कुणी आदेश दिले होते हे उघड होण्यासाठी चौकशी झाली … Read more

error: Content is protected !!