बातमी

तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेवावा – दलितमित्र एस आर बाईत

मुरगूड ता.२९ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य सेनानीनी केलेल्या त्यागातुन देशाला स्वातंत्र्य मिळाले असल्याने देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास नेहमी डोळ्यासमोर ठेवा असे प्रतिपादन नवनिर्माण सामाजिक चळवळीचे संस्थापक व दलितमित्र एस. आर बाईत यानी केले श्री बाईत कुरुकली ता कागल येथील न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानातं बोलत होते

श्री बाईत पुढे बोलताना म्हणाले क्रांतीच्या लढ्यात कागल तालुक्यातील तरुण आघाडीवर होते यामध्ये तुकाराम भारमल, हरीबा बेनाडे, मल्लू चौगले, करवीरय्या स्वामी , शंकरराव इंगळे , पै मल्लू चौगले , परशुराम साळुंखे , बाबू जबडे , नारायण वारके या तरुणांनी त्याग केला म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले, तोच आदर्श घेऊन विध्यार्थ्यांनी वाटचाल करावी. देश स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्याचे नेहमी स्मरण करा

स्वातंत्र्यासाठी मुस्लिम बांधवाचाही सहभाग आहे हे कोणालाही नाकरता येणार नाही.म्हणून जाती पातीचे राजकारण बाजूला सारून यापुढेही सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे. प्रत्येकाला आई असतेच मात्र सावित्रीबाई फुले ही एक प्रत्येक विध्यार्थीनीची आई आहे

शालेय जीवनानंतर प्रत्येक विध्यार्थ्यांने आपले गुरु आपले आईवडील, यांना विसरू नका असे आवाहन उपस्थित सर्व विध्यार्थ्यांना श्री बाईत यानी केले. स्वागत मुख्याध्यापक एस. डी. कांबळे यानी केले आभार सहाय्यक शिक्षक एस. डी कांबळे यानी मानले यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी उपस्थित होते

2 Replies to “तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेवावा – दलितमित्र एस आर बाईत

  1. Your posts always provide me with a new perspective and encourage me to look at things differently Thank you for broadening my horizons

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *