
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड चे माजी नगराध्यक्ष , बिद्री साखर जेष्ठ संचालक, शेतकरी सहकारी संघ कोल्हापूरचे संचालक प्रविणसिंह पाटील ( दादा ) यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत पूनम अविनाश परीट या विजेत्या ठरल्या. मानाच्या पैठणी सह स्कुटी पारितोषिकाच्या त्या मानकरी ठरल्या .स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे वाशिंग मशीन पारितोषिक मनीषा विनायक मडिलगेकर यांनी तर, तृतीय क्रमांकाचा फ्रिज बक्षीस वर्षाराणी अनिकेत रामाने व चतुर्थ क्रमांकांचा टीव्ही निशिगंधा रणजीत भारमल, पाचव्या क्रमांकाचा मिक्सर – सरिता रणजीत पांडे, सहावा क्रमांकाची पैठणी – ममता संदीप वड्ड यांनी बक्षीसे पटकावली.
होम मिनिस्टर स्पर्धेत सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बाल गायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम सादर केला .
कार्यक्रमाचे आयोजन कुबेर रियल इस्टेट नवनाथ सातवेकर , रणजीत भारमल , प्रशांत खंडागळे, संपत कोळी ,संदीप वड्ड राजू जाधव.व वाढदिवस गौरव समिती यांच्यावतीने करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे,बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के .पी. पाटील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शितल फराकटे यांनी मनोगते व्यक्त केली. बक्षीस वितरण सुहासिनीदेवी पाटील, बिद्री साखर कारखान्याच्या संचालिका रंजना पाटील व स्नेहा सातवेकर आदि मान्यवरच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक चे बक्षीस टीव्ही होती ते बक्षीस कार्यक्रमाचे संयोजक रणजीत भारमल यांची पत्नी निशिगंधा भारमल यांना मिळाले होते परंतु तेच बक्षीस त्यांनी मुरगुड मधील गरीब असलेल्या विधवा श्रीमती उज्वला सोनुले यांना बक्षिस दिले. आपल्या पत्नीला मिळालेले पारितोषिक एका अनाथ विधवा महिलेला देण्याचा आदर्श भारमल यांनी घालून दिल्याची चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी होती.
कार्यक्रमाचे स्वागत रणजित भारमल तर प्रास्ताविक अॅड सुधीर सावर्डेकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पाटील व एम बी टिपुगडे यांनी केले तर आभार सम्राट मसवेकर यांनी मानले.