कागल पोलीस ठाण्याच्या नजीक घडली घटना
कागल /प्रतिनिधी : सोनाराने दुकान बंद करून रोख रक्कम व सोने असलेली बॅग सुझुकी मोटरसायकलच्या डीग्गीत ठेवली. एका दुकानासमोर मोटरसायकल उभी करून दुकानातून कंगवा खरेदी करण्यासाठी गेला असता, साडेबारा लाखांची बॅग अज्ञाताने हातोहात लांबविली.
ही घटना सोमवारी रात्री पाहुणे नऊ वाजण्याच्या सुमारास कागल पोलीस ठाण्याच्या नजीक असलेल्या रस्त्यावर एका दुकानासमोर घडली.
250 ग्रॅम सोनं व रोख रुपये 1 लाख 70 हजार असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याने पोलीस खात्याची चांगलीच झोप उडाली आहे. कागल पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागासह पोलीस खात्यातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी सपाटून तपासाच्या कामाला लागले आहेत. पोलीस पथके रवाना झाली आहेत.
हे कागल शहराच्या प्रमुख मार्गावर पोस्ट ऑफिस समोर सागर बाळासो घुगरे यांच्या मालकीचे सोन्याचे दुकान आहे. लक्ष्मीनारायण ज्वेलर्स असे त्या दुकानाचे नाव आहे.
कागल पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सागर घुगरे यांच्या मालकीचे सोन्या दुकान गेले कित्येक वर्षे झाली कागल शहरात आहे.
दररोज सकाळी 9 ते सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंत हे दुकान सुरू असते. सोमवार व गुरुवारी दोन दिवशी कागलचा बाजार असल्याने दुपारी सुट्टी नसते या दुकानात मालक सागर घुगरे यांचा भाचा आकाश ज्योतिबा घाडगे वय वर्षे 28 हा काम करतो.
तो दररोज दुकान बंद करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन घरी जात असतो. सोमवारचा दिवस बाजाराचा होता. दुकानात गर्दी होती. दागीण्यांसह रोख रक्कम ही बर्यापैकी होती.
सायंकाळी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करून आकाश गाडगे हा ॲक्सिस दुचाकी गाडी क्रमांक एम एच झिरो 9 एफएल 2151मध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग ठेवली.
पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या रंगोली दुकानासमोर गाडी थांबून तो कंगवा घेण्यासाठी गेला. गाडीला चावी लावुन गाडी सुरू ठेवली.
दरम्यान पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्याने गाडीची चावी घेऊन डीग्गी उघडली व त्यातील बॅग घेऊन तेथून त्याने पोबारा केला अशी चित्रफित ही पोलिसांच्या हाती लागली आहे.
दरम्यान या प्रमुख रस्त्यावरील लाईट ही या काळात बंद होती याची चर्चा दिवसभर शहरात रंगत होती
चोरीच्या घटनेची नोंद पोलिसात झाली
असून पोलिस निरीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गच्ची हे अधिक तपास करीत आहेत.