प्रथमच मुरगूडमध्ये खास महिलासाठी “मिस मुरगूड किताब”
मुरगुड ( शशी दरेकर ) – बिद्री साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक, मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील ( दादा ) यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगुड तालुका कागल येथे भव्य खुल्या गटातील ” होम मिनिस्टर ” स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती माजी नगरसेवक संपत कोळी व बंडा भारमल यांनी दिली .
मुरगुड मध्ये प्रथमच खास महिलांच्यासाठी मिस मुरगुड किताबाचे आयोजन करण्यात आले आहे.कुबेर रियल इस्टेट मुरगुड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर, बाल गायिका टी.व्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांचे या कार्यक्रमासाठी निवेदन असून या स्पर्धा विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी इलेक्ट्रिक स्कुटी, द्वितीय क्रमांक वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांक फ्रिज, चतुर्थ क्रमांक 32 इंची टीव्ही, पाचवा क्रमांक मिक्सर, सहावा क्रमांक वीस मानाच्या पैठणी, देण्यात येणार आहे.
गुरुवार दिनांक 25 जानेवारी रोजी हुतात्मा तुकाराम चौक मुरगुड या ठिकाणी या स्पर्धा होणार असून स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यानी आपली नावे द प्रोफेशनल ब्युटी पार्लर, अमिना लेडीज शॉपी ,बाळूमामा मोबाईल शॉपी, सुविधा सुपर बाजार या ठिकाणी नांवे नोंदवावी असे आवाहन बंडा भारमल बंडा खंडागळे, दिग्विजय चव्हाण, संदीप वड्ड, अमृत भोसले यांनी गौरव समितीच्या वतीने केले आहे.