बातमी

मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघात शिक्षक दिन उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. व्यक्तीगत जीवनात शिक्षकांनी नीतीमूल्यांची कसोशीने जोपासना करावी असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य पी. डी. मगदुम यानी केले.

मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विरंगुळा केंद्रात आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रारंभी संघाचे संचालक जयवंत हावळ यांनी स्वागत केले. अध्यक्ष पी डी मगदूम यांच्या हस्ते डॉ . राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .सचिव सखाराम सावर्डेकर यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.व्याख्याते प्रा .किशोरकुमार पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची विस्ताराने माहिती दिली. त्यानंतर गुरुवर्य पांडुरंग पाटील, डी डी चौगले, विनायक हावळ, सौ विद्यागौरी हावळ, निवृत्ती वंडकर, प्रा. चंद्रकांत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शिक्षक दिनानिमित्त मोहन अनावकर, प्रकाश पाटील, डी डी चौगले, विष्णुपंत खैरे , विनायक हावळ, गजानन गंगापुरे, पांडुरंग पाटील, बाजीराव भारमल, मधुकर सामंत , आनंदा जालीमसर, गजानन मोहिते, किशोरकुमार पाटील, सौ विद्यागौरी हावळ , निवृत्ती वंडकर, तानाजी डवरी, मधुकर मंडलिक, प्रा. चंद्रकांत जाधव, जयवंत हावळ, पी डी मगदूम आदि गुरुजनांना गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी लोकमंगल मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्हचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी शिक्षक दिनाच्या औचित्याने शिक्षकांना दिलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले . तसेच सेवक पवार व खराडे यांनी गुरुजनांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला व संस्थेच्या विविध कार्याची व ठेव योजनांची माहिती दिली. याप्रसंगी अनेक शिक्षकांनी संघाच्या कार्यास देणग्या देऊन आर्थिक हातभार लावला . याबद्दल संघामार्फत आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमास संघाचे संचालक महादेव वागवेकर, सिकंदर जमादार, गणपती शिरसेकर, तुकाराम भारमल, पांडुरंग चांदेकर, सदाशिव यादव, बळी डेळेकर, मारुती शेणवी, रामचंद्र रनवरे दादू बरकाळे, दादोबा मडिलगेकर, प्रदीप वर्णे इ.बहुसंख्येने उपस्थित होते. अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *