कागल : कागल येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली.
कागल येथील बहुउद्देशीय सभागृहानजीकच्या नवीन इमारतीसमोर प्रकाश शिवाजी मगदूम (रा. बामणी, ता. कागल) यांनी लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर चोरट्याने चोरून नेली,
तर जयसिंगराव पार्कमध्ये बँक ऑफ बडोदा येथे लावलेली कृष्णाजी श्रीनिवास कुलकर्णी (रा. जयसिंगराव पार्क, कागल) यांची हिरो होंडा स्प्लेंडर चोरट्याने चोरून नेली.