बातमी

मोटरसायकलला अज्ञात वाहनाची धडक : पिंपळगावचा एकजण ठार, एकजण गंभीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड,ता. ३ : कागल – निढोरी राज्यमार्गावर पिंपळगाव बुद्रूक गावच्या हद्दीत केनवडेहून पिंपळगावाकडे जात असताना मोटरसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार शामराव बाबू सुर्यवंशी (वय ६० – रा.पिंपळगांव बु ॥ ) हे ठार झाले आहेत.तर आनंदा शंकर मांगोरे (वय ५२ – रा.पिंपळगांव बु II ) हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरुन व मुरगूड पोलीसांतून मिळालेली माहिती अशी, पिंपळगांव बु II(ता.कागल ) येथील शामराव बाबू सुर्यवंशी वय (६० ) व आनंदा शंकर मांगोरे ( वय ५२) हे दोघे कामानिमित्त केनवडे येथे मोटरसायकल (क्रमांक एम.एच.०९ सी क्यू ८४०३) वरुन गेले होते.काम आटोपून ते पिंपळगांवकडे घरी परत जात होते.

पिंपळगाव फाट्यावरील रस्त्याने न जाता ते केनवडेहून येत असताना पिंपळगांवकडे जाणाऱ्या जवळच्या रस्त्याने जाण्यासाठी वळत असताना पाठीमागून अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.

या धडकेत मोटरसायकलवरील शामराव सुर्यवंशी व आनंदा मांगोरे हे दोघेही रस्त्यावर जोरात आपटले. दोघांचाही जोरदार रक्तत्राव झाला.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला तातडीने उपचारासाठी नेले.

या अपघातात शामराव सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला असून आनंदा मांगोरे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या दुर्घटनेनंतर पिंपळगांवावर शोककळा पसरली होती.रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम मुरगूड पोलीस करीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *