दिल्ली : दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील स्वातंत्र्यवीर सावरकर जंयतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आल्याने काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्यानंतरही राज्यात गोंधळ घालणारे आमदार गोपीचंद पडळकर हे शांत का ? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही अशा स्पष्ट शब्दात पवार यांनी समाचार घेतला. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेचाच नाही तर देशाच्या अस्मितेचा अपमान केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.