24/09/2022
0 0
Read Time:2 Minute, 21 Second

कोल्हापूर : कृषि विभागामार्फत राज्य शासनाचे mahadbtmahait.gov.in हे पोर्टल कार्यान्वित असून शेतक-यांचे मागणी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे. कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांचे अर्ज या पोर्टलवर स्विकारण्यात येतील. सर्व साखर कारखाने / बचत गट / आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी कृषी अवजारे बँकसाठी ऑनलाईन मागणी नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

शेतक-यांची पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याची माहिती पोर्टलवर ‘ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना’ या सदराखाली देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांमधील सर्व कृषि अवजारे निवडीसाठी उपलब्ध राहतील. यांत्रिकीकरण योजनेतंर्गत अवजारे बँक या घटकांतर्गत शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

या योजनेतंर्गत कृषी यंत्र व औजारांसाठी (अजा/अज/अल्प/ अत्यल्प/महिला शेतकरी) व (इतर शेतकरी ) यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वंयचलित यंत्रे, ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित यंत्रे, सर्व मनुष्य / बैल चलित यंत्रे औजार, काढणीत्तोर यंत्रे उपकरण, पिक संरक्षण उपकरणे यासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.

ऊस पीकाखालील क्षेत्र असलेल्या गावातील अवजारे बँकेमध्ये पाचट कुट्टी मशिन असणे बंधनकारक राहील. तसेच ऊसाचे खोडवा पीक असले तर त्या क्षेत्रासाठी सर्व कारखान्यांनी एकरी 4 किलो पाचट कुजविणारे जीवाणू देणे आवश्यक राहील, असेही कळविले आहे.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!