बातमी

सिनियर सायंटिस्ट श्री केरबा आनंदा लोहार यांची श्री दत्त देवस्थान मठ आडी ला सदिच्छा भेट

आडी(राजकुमार पाटील): संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या चंद्रयान -3 या भारताच्या अंतराळ मोहिमेतील चांद्रयान मोहिमेत सक्रिय सहभाग असलेले सीनियर सायंटिस्ट श्री केरबा आनंदा लोहार यांनी हार्दायन श्री दत्त देवस्थान मठ आडी येथे येऊन भगवान दत्तात्रेयांचे व परमपूज्य परमात्मराज महाराजांचे आशीर्वाद घेतले.

चांद्रयान – 3 च्या यशस्वितेनंतर पहिल्यांदाच ते आपल्या मूळ गांवी आडीला आले आहेत. या मोहिमेत रोव्हरच्या सेंसर विभागामध्ये त्यांनी आपले मोलाची योगदान दिले आहे. आतापर्यंत इस्रो मार्फत झालेल्या चंद्रयान – 1, 2, 3 व इतरही अनेक मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

लहानपणापासूनच त्यांनी अभ्यासू वृत्ती, जिद्द, चिकाटीच्या जोरावर अतिशय मेहनत करून अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन आज ते इस्रो मध्ये कार्यरत आहेत.

यावेळी केरबा लोहार यांनी सांगितले की, मी लहानपणापासूनच दत्त मंदिर ला येत होतो. त्यामुळे कॉलेज पासूनच महाराजांच्या सान्निध्यात आहे. आरंभापासूनच महाराजांचे मार्गदर्शन घेऊन मी वाटचाल सुरू केली. आतापर्यंत मला जे काही यश मिळाले आहे त्यासाठी प.पू.परमात्मराज महाराज यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे. आमच्यासाठी महाराज हेच खरे ज्ञानपीठ आहेत. महाराज हे इंजिनिअरिंग, मेडिकल सायंस आणि सायन्स च्या विविध शाखा तसेच इतरही ज्ञानशाखांचे विद्यापीठ आहेत. त्यामुळे आमच्या सारखे शिक्षित लोक सुद्धा त्यांना मानतात. आम्ही त्यांचे प्रत्येक कामाला आशीर्वाद घेत असतो. मला काम करताना महाराज माझ्या पाठीशी खंबीर उभे असल्याचे जाणवते, असे उद्गार सत्काराला उत्तर देताना श्री के ए लोहार यांनी काढले.

धार्मिक, वैद्यकीय, भूगोल, खगोलशास्त्र इ. अनेक विषयांची सखोल माहिती महाराज मला पूर्वी पासून देत होते. त्यांचा आशीर्वाद प्रत्येक क्षणी माझ्या सोबत आहे आणि इथून पुढेही असावा” अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

प. पू. परमात्मराज महाराजांनी 23/8/2023 ला चन्द्रयान -3 सफल झाल्यानंतर तात्काळ श्री केरबा लोहार यांना अभिनंदनाचे पत्र पाठविले होते व नुकताच श्री लोहार यांची प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांचा सत्कार करून त्यांच्या कामाचे मनःपूर्वक कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी हार्दायन, श्री दत्त देवस्थान मठात मार्फत प.पू. परमात्मराज महाराजांनी सायंटिस्ट के ए लोहार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केल्या नंतर उपस्थित भाविकांनीही इस्रोचे व तेथे कार्य करणाऱ्या सर्वच वैज्ञानिकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी लोहार यांनी महाराजांना चंद्रयान -3 संबंधित एका प्रक्रियात्मक मॉडेल चे छायाचित्र भेट दिले.यावेळी शास्त्रज्ञ केरबा लोहार यांनीश्रावणी मल्लिकार्जुन यात्रेचे औचित्य साधून श्री मल्लिकार्जुन देवाचे व भ्रमरांबिका देवीचे दर्शन घेतले. मल्लिकार्जुन पालखी सोहळ्यामध्ये ही सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *