ताज्या घडामोडी

मुरगूडातील कुस्ती स्पर्धेतून 80 जणांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) – दोन दिवस चाललेल्या मुरगूडातील कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मुरगूडच्या विजयमाला मंडलिक गर्ल्स (19 सुवर्णपदके )व शिवराज हायस्कूल (14 सुवर्णपदके) यांनी वर्चस्व राखले. शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुरगुडच्या वतीने लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये स्पर्धा झाल्या. स्पर्धेतील विजेत्या 80 मल्लांची 16 सप्टेबरपासून होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रकाश खोत, दादा लवटे, के. बी. चौगुले, बाळासाहेब मेटकर, रवींद्र पाटील, अक्षय डेळेकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांनी काम पाहिले.

स्वागत प्राचार्य पी. डी. माने, प्रास्ताविक उपमुख्याध्यापक प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवान डवरी आणि डॉ. आनंद मोरे यांनी स्पर्धेस सदिच्छा भेट दिली. आभार तालुका क्रीडा समन्वयक एकनाथ आरडे यांनी मानले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे (कंसात शाळेचे नाव) 14 वर्षाखालील मुले- (फ्री स्टाईल)

 • 35 कि. -समरजित पाटील (शिवराज मुरगूड),
 • 38 कि.- ईशांत धनवट (शिवराज मुरगूड),
 • 41 कि.- जीवन मगदूम (शिवराज मुरगुड),
 • 44कि. -वेदांत निकम (न्यू इंग्लिश कुरुकली),
 • 48 कि. -आयाज सुतार ( मुरगुड विद्या.),
 • 57कि. -नीलकंठ पाटील( महात्मा फुले बेलवळे),
 • 62कि. – वीर पाटील (हॉलिडे सीबीएस कागल),
 • 68कि.- संदेश माने (शिवराज मुरगुड).

14 वर्षाखालील मुली- (फ्री स्टाईल)

 • 30 कि.- मधुरा हांडे विद्यामंदिर (मौ.सांगाव),
 • 33कि.- अन्विता साळुंखे (विजयमाला मं. मुरगुड),
 • 36कि.- सृष्टी रेडेकर (विजयमाला मं. मुरगुड),
 • 39कि.- गायत्री घाटगे (विजयमाला मं. मुरगुड),
 • 42कि.- अपर्णा ठोंबरे (विजयमाला मं. मुरगुड),
 • 46कि.- श्रृती टेंगळे (विजयमाला मं. मुरगुड),
 • 50कि.- श्रावणी शिनगारे (विजयमाला मं. मुरगूड ),
 • 54कि.- कृतिका फडतारे (विजयमाला मं. मुरगुड),
 • 58कि.- मधुरा खंदारे (न्यू इंग्लिश कुरुकली),
 • 62कि.- तनया देवळे (विजयमाला मं. मुरगुड).

17 वर्षाखालील मुली (फ्री स्टाईल)

 • 36 ते 40 कि.- सानिका जाधव (विजयमाला मं. मुरगुड)
 • 43 कि.- पायल पाटील (न्यू हायस्कूल बाचणी) अनुष्का कांबळे (महात्मा फुले बेलवळे),
 • 46 कि.- प्रतीक्षा सावंत (शिवराज मुरगुड),
 • 49 कि.- संस्कृती रेडेकर (विजयमाला मं. मुरगुड),
 • 53 कि.- श्रुतिका पाटील ( विजयमाला मं. मुरगूड),
 • 57कि.- पूजा पाटील (कॉ. सावंत बानगे),
 • 61 ते 63कि- अमृता शिसाळ (विजयमाला मं. मुरगुड),
 • 65कि.- अपेक्षा पाटील (विजयमाला मं. मुरगुड),
 • 69कि.- संस्कृती पाटील (विजयमाला मं. मुरगुड),
 • 73कि.- भार्गवी सटाले (विजयमाला मं. मुरगुड)

19 वर्षाखालील मुली (फ्री स्टाईल)

 • 50 कि.- गौरी पाटील (शिवराज मुरगुड),
  53कि.- मधुरा वाईंगडे (शिवराज मुरगूड),
  55कि.- राजनंदिनी कदम (विजयमाला मं. मुरगुड)
 • 57कि.- तन्वी मगदूम (शिवराज मुरगुड),
 • 59कि.- प्राजक्ता बारड (विजयमाला मं. मुरगुड),
 • 62कि.- संज्योती पाटील (विजयमाला मं. मुरगुड),
 • 65कि.- अकांक्षा गुरव (वि.मं. मुरगुड),
 • 68कि.- शिवानी मेटकर (शिवराज मुरगुड),
 • 76 कि.- समृद्धी किनीकर (न्यू इंग्लिश मीडियम मुरगुड)

17 वर्षाखालील मुले (फ्री स्टाईल)

 • 41ते 45 कि.- धनराज जमनिक (श्रमिक बाणगे),
 • 48कि.- प्रथमेश बोंगार्डे (पिंपळगाव हायस्कूल),
 • 51कि.- सोहम कुंभार (म्हाकवे इंग्लिश),
 • 55कि.- सत्यजित लाड (मुरगुड विद्या७),
 • 60 कि.- सत्यजित बंडगर (डी आर माने कागल),
 • 65 कि.- रोहित येरुडकर (पिंपळगाव हाय.),
 • 80 कि.- श्रीपाल भोसले (भारत माता बोरवडे),
 • 110कि.- दर्शन पाटील (पिंपळगाव हाय.)

17 वर्षाखालील मुले (ग्रिको रोमन)

 • 41ते 45 कि.- अनिकेत पाटील (म. फुले बेलवळे),
 • 48 कि.- शुभम मगदूम (सिद्धनेर्ली हाय.),
 • 51कि.- सत्यजित संकपाळ (श्रमिक बानगे),
 • 55कि.- कौतुक शिंदे (मुरगुड विद्यालय),
 • 60कि.- ऋषिकेश डेळेकर (शिवराज मुरगुड),
 • 65कि.- हर्षवर्धन हिंदुराव पाटील (म. फुले बेलवळे),
 • 71कि.- समीर पाटील (सदाविजय म्हाकवे),
 • 80कि.- आदित्य दिवटे (शिवराज मुरगुड ),
 • 110 कि.- श्रेयश गिरी (म. फुले बेलवळे बु)

19 वर्षाखालील मुले (फ्री स्टाईल)

 • 57कि.- प्रतीक चौगुले (न्यु हाय. बाचणी),
 • 61कि.- संकेत मेथे (न्यू हाय. बाचणी),
 • 65 कि.- यश खाडे (देवचंद अर्जुननगर),
 • 70कि.- राजवर्धन पुजारी (मुरगुड विद्यालय),
 • 74कि. तन्वीर कांबळे- शाहू कागल
 • 79कि.- सुदेश नरके (महालक्ष्मी लिंगनूर),
 • 86 कि.- पृथ्वीराज जाधव (महालक्ष्मी सावर्डे),
 • 110 कि.- दर्शन पाटील (पिंपळगाव हाय)

19 वर्षाखालील मुले (ग्रिको रोमन)

 • 55कि.- संज्योत कुंभार (शिवराज मुरगुड),
 • 60कि.- संस्कार भारमल (शिवराज मुरगुड),
 • 63 कि.- आदित्य देसाई (दूधसाखर बिद्री),
 • 67 कि.- प्रमोद शेळके (म. फुले बेलवळे),
 • 72 कि.- प्रणव गोरुले (मुरगुड विद्या.),
 • 77कि. – श्रावण भारमल (शिवराज मुरगूड),
 • 82 कि.- विवेक घाटगे (मुरगुड विद्या.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *