ताज्या घडामोडी

समाजप्रिय अवलिया देवानंद पाटील (नेतेजी)

मुरगुड(शशी दरेकर) :

समाजप्रिय अवलिया देवानंद पाटील नेतेजी


………………………………….
समाजकार्यासाठी झपाटून काम करणार्‍या तळमळीच्या कार्यकर्त्यांची आज खुप मोठी वानवा आहे.भौतिक सुखाच्या मागे धाव धाव करणारी माणसं बघितली की सुन्न करणारा अंधकारमय भविष्यकाळ संवेदनशील मनाला चटका लावतो.पण आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील, अनेक समस्यांचा सामना करत,समाजासाठी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी अहोरात्र काम करणारे, अनेक खचलेल्या मनांना नवी संजीवनी देणारे, माझ्या दृष्टीक्षेपातील माणुसकीने ओतप्रोत भरलेलं एक व्यक्तीमत्व म्हणजे देवानंद पाटील नेतेजी…..
माझ्यामते आपण आयुष्यात तिघांजणांचे देणं लागतो 1) ज्या आईवडीलांनी आपल्याला ही दुनिया दाखविली त्या आईवडीलांचे व त्यांचे सोबत कुटूंबाचेही 2)ज्या समाजाने आपल्याला जगायला शिकवलं त्या समाजाचे 3)आणि ज्या निसर्गाने आपल्याला अनेक गोष्टी विना मोबदला अखंडीत देऊ केल्या त्या निसर्गाचे …त्याची पक्की जाणीव निश्चितपणाने नेतेजींना आहे म्हणुन अनेक कौतुकास पात्र उपक्रमांच्या माध्यमातुन नेतेजी नेहमीच चर्चेत असतात.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सुरवात एकट्याने करावी लागते पण जिंकल्यानंतर आपल्या सोबत सर्वच असतात हे नेतेजींनी खुप लहान वयातच ओळखले असावे म्हणुनच त्यांच्या सामाजिक कामाची सुरूवात ही ‘एकला चलो रे ‘अशीच झाली.
मध्यवर्गीय कुटुंबात जन्मलेले नेतेजी हे विद्यार्थी दशेपासुनच विविध प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये अग्रभागी आहेत.समाजप्रबोधनाशिवाय तरणोपाय नाही यावर ठाम विश्वास ठेवून शाश्वत विकासासाठी त्यांनी अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले. सामाजिक कार्याच्या तळमळीतुन त्यांनी गावात विविध संस्थांची स्थापना केली.कै.केदारी पाटील सेवाभावी संस्था,जिजामाता दुध संस्था,अॅटवन्स युवामंच, सावित्रीबाई फुले महिला बचत गट,रमाबाई आंबेडकर महिला भिशी मंडळ,देवानंद पाटील युवा मंच या संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कामाची सुरूवात गतिमान झाली. 1993 साली त्यांनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून त्या वेळेच्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकांना जागृत करण्याचे विशेष काम केले.त्याकाळी डंकेलच्या डंकाने आपण हैराण होणार का? बेरोजगारी एक गंभीर समस्या हे विषय महाराष्ट्रभर फार गाजले होते. शाहीरी स्पर्धा,कराटे राष्ट्रीय शिबीर, एड्स जनजागृती शिबीर, रक्तदान शिबीर,शेतकरी सशक्तीकरण शिबीर, गाव तिथे वाचनालय चळवळ,विद्यार्थी चळवळ,सेल्फ डिफेन्स चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, निसर्ग संवर्धन चळवळ, पाणलोट विकास कार्यक्रम,पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम,वादविवाद स्पर्धा, जागो हिन्दुस्तान सारखे सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना शाश्वत विकासाची गरज पटवून दिली.

साध्या पोष्टमनचा मुलगा असलेल्या देवानंद पाटील यांनी पत्नी जयश्री सह निढोरीचे सरपंचपद भुषविण्याचा ऐतिहासिक बहुमान पटकावला आहे . अशा कुशल संघटक असलेल्या देवानंद पाटील यांना ४७ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
…..


महाराष्ट्र ही शिव,शाहु ,फुले आंबेडकरांची भुमी आहे. संतांच्या परंपरेनेही महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात नक्कीच भर पडली आहे.म्हणूनच संतांचा, महापुरूषांचा,महात्म्यांचा खरा इतिहास समाजापर्यंत पोहचावा,त्यांच चरित्र समाजापर्यंत पोहोचावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुरोगामीत्वाची पक्की बैठक असलेल्या नेतेंनी अंदाजे 200 भर व्याख्याने आयोजित करून समाजाच्या विचाराची दिशा स्पष्ट करून दिली.यांच्या व्याखानमालेमध्ये समाजवादी प्रबोधनीचे शांताराम गरूड,शिवाजी कोण होता पुस्तकाचे लेखक गोंविद पानसरे,अर्थतज्ञ जे.ए.पाटील,महान स्वातंत्र्यसेनानी नागनाथअण्णा पाटील,संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे, बालाजी गाडे पाटील,बालाजी जाधव,अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद सबनीस, टी.एम पाटील, राजा शिरगुप्पे अशा अनेक दिग्गजांनी मार्गदर्शन केले आहे. 2017 च्या व्याख्यानमालेमध्ये चार वेगवेगळ्या पक्षाच्या चार आमदारांना एकाच व्यासपीठावर एकत्र बोलवून ‘माझी आमदारकी कशासाठी'(संविधानिक जबाबदारी आणि माझी आमदारकी ) ही संवादसभा अनेकांचं लक्ष वेधून घेणारी ठरली.या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडुन आमदार हसन मुश्रीफ,राष्ट्रीय काँग्रेसकडुन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबीटकर आणि भाजप कडुन आमदार सुरेश हाळवणकर यांनी लोकांशी संवाद साधला.नेतेजींनी आईच्या व वडीलांच्या पुण्यस्मरणाला प्रबोधनात्मक कार्यक्रम,वृक्षारोपन,महीलांसाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून नवा आदर्श समाजाला घालून दिला आहे. जया अंगी मोठेपणा,तया यातना कठीण या आजोबा केदारी पाटील यांनी दिलेल्या कानमंत्राने सामाजिक कामाची सुरूवात झाल्यामुळे नेतेजी सामाजिक कामात कधीच खचले नाहीत,त्यांनी त्यांचा आत्मविश्वास कधीच ढळू दिला. तुका म्हणे जे जैसे करिती। पावेल तो तैसेची फळे।। तुकाराम महाराजांच्या वरील अभंगातील ओळीप्रमाणे जो जसा वागतो त्याला फळं ही तसंच मिळतं हे अगदीच खरं आहे.नेतेजींच्या कामाची दखल घेवून त्यांना अनेक सामाजिक संस्थांनी व संघटनांनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.आदर्श युवा पुरस्कार, दलित मित्र,समाजसेवक, समाजरत्न,
सामाजिक कार्यकर्ता आदी पुरस्कारांनी सन्मानित केले.
राजकारणाशिवाय सामाजिक काम करताना येत असणाऱ्या मर्यादा विचारात घेवून आणि खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या व खासदार संजय मंडलिक साहेबांच्या यांच्या लोककल्याणकारी विचारधारेने प्रेरित होवून नेतेंजींच्या राजकीय प्रवासाला मंडलिक परिवारातुनच सुरुवात झाली.समाजकारणाची राजकारणाशी सांगड घालताना नैतिकतेवर श्रद्धा ठेवून त्यांचा समाजात वावर सुरू झाला.निढोरी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये तब्बल 27 वर्षानी सत्ता बदल घडविण्याचा निर्णय त्यांनी सत्यात उतरविला. हे त्यांच्या नेतृत्वातील करिष्मामुळेच शक्य झाले असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही.पुढे त्यांनी बदलत्या राजकीय समीकरणांचा आधार घेत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांच्या विकासात्मक चेहऱ्याला भारावून मुश्रीफ गटाची पताका खांद्यावर घेवून ते राजकारणाची वाटचाल करत आहेत.
मा.देवानंद पाटील नेतेजींकडे नोव्हेंबर 2017 मध्ये सरपंच पदाची धुरा आली आणि निढोरीकरांना विकासाची दृष्टी असणारं एक व्यक्तीमत्व सरपंच म्हणून मिळालं आणि खऱ्या अर्थानं निढोरीच्या विकास पर्वाला सुरुवात झाली.सरपंच झाल्यानंतर पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी जाहीर केले की माझ्या सरपंच पदासाठी मिळणारे मानधन सामाजिक कामासाठी व प्रबोधनात्मक कामासाठी वापरणार असल्याचे सांगुन अनेक सरपंचासाठी नवा पायंडा पाडुन निढोरीच्या गौरवशाली परंपरेत भर घातली.त्यांच्या सरपंच काळात महादेव मंदिरास ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला आहे त्याचा गावकऱ्यांना पुरेपूर फायदा होणार आहे .निढोरीसाठी शुद्ध फिल्टर पाणी योजनेला मंजुरी मिळाली त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे. 25:15 व दलितवस्ती निधीतून अंतर्गत रस्ते व गटर्ससाठी 75 लाख रुपये उपलब्ध केले त्यामुळे निढोरीतील अंतर्गत रस्त्याची समस्या संपलेली आहे.तांडावस्ती व डाॅ बाबासाहेब आंबेडकर विकासनिधीमुळे दलित वस्तीच्या विकासात मोठी भर पडली आहे. शाळा दुरुस्ती, 14 वर वित्त आयोग ,खासदार फंड, आमदार फंड, 25:15 यामाध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामाची पूर्तता झाली आहे.तसेच साकव पुल, दलित वस्ती पाणी योजना, कुरणी वसाहत, सांस्कृतिक हाॅल, बुद्ध विहार, रमाई व पंतप्रधान आवास योजना ,शाहु घरकुले,अपंगांच्या नागरी सुविधा असे अनेक प्रस्ताव शासनाकडे पाठवुन त्याची पूर्तता करुन घेतली आहे.अशा विविध लोककल्याणकारी विकास कामातून राजकारण हे समाजाची सेवा करण्याचे साधन आहे हेच अधोरेखित केले.
एका सुभाषिताप्रमाणे – काक दृष्टी,कोध्यान व श्वाननिद्रा एथेवच!! कावळ्यासारखी चतुर दृष्टी,बगळ्यासारखे ध्यान आणि कुत्र्यासारखी झोप असे चपळ गुण घेवुन नेतेजी समाजात वावरताना दिसतात.समाज परीवर्तनाच्या वांझोट्या गप्पा अनेक जण मारत,स्वतःचीच आत्मस्तुती करणारे अनेकजण असतात.पण माणसांच्या मनाच्या वेदनांचा विचार करणारी नेतेजींसारखी अपवादात्मक माणसं समाजात दिसतात.त्यांच्या धडाडीच्या सामाजिक कार्यामुळे नजिकच्या काळात त्यांच भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.याच नेतृत्वगुणांला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी संधी दिली तर ते संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत हे निश्चित……..
येत्या भविष्यकाळामध्ये तुमच्याकडुन उल्लेखनिय कामगिरी होवो अशा प्रकारच्या मनःपुर्वक शुभेच्छा.आपणास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच निर्मात्या चरणी प्रार्थना …
तुमच्या ध्येयवेड्या,निस्पृह,निष्कलंकी जीवनप्रवासाला सलाम करताना एवढेच म्हणावेसे वाटते,
उत्तुंग व्हा एवढे।
गगनही वाढावे बापुढे।
तुमच्या यशाचे पोवाडे घुमावे।
समृद्धीचे,सह्याद्रीचे कडे।
💐💐💐💐💐💐💐

🌹वाढदिवसाच्या शुभेच्छा🌹
देवानंद पाटील (नेतेजी),
आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

शब्दांकन – विकास सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *