27/09/2022
0 0
Read Time:2 Minute, 26 Second

मडिलगे (जोतिराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे शिवजयंती निमित्त शिव जन्मोत्सव ढोल ताशे, लेझीम पथके, तसेच महाप्रसाद वाटप करून मोठ्या उत्साहात पार पडला . वाघापूर येथील राजे स्पोर्ट्स च्या वतीने शिवजयंतीनिमित्त होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती . यात सुप्रिया विनायक पाटील या प्रथम क्रमांकाच्या मानाच्या पैठणी साडी च्या मानकरी ठरल्या.

द्वितीय क्रमांक पुनम अक्षय कुरडे, तृतीय क्रमांक साक्षी जोतीराम आंबी तर चतुर्थ क्रमांक प्रतिभा सचिन दबडे यांनी पटकावला, वाघाची तालीम मंडळाच्यावतीने भव्य मिरवणूकीसह सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते, शिवशक्ती तरुण मंडळ बाबा ग्रुप बिरदेव चौक यांच्या वतीने शिव जन्मकाळ सोहळा तसेच सायंकाळी लेझीम पथकासह पालखी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी प्रत्येक गल्ली..गल्लीत बालचमूंनी शिवजयंती साजरी केल्याने वातावरण संपूर्ण दिवसभर शिवमय झाले होते.
ग्रामपंचायत वाघापूर यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात मुस्लीम समाजातील उद्योजक ” राजेंद्र आत्तार ” यांच्या शुभहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ. जयश्री कुरडे, उपसरपंच सौ. शुभांगी कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस भुदरगड तालुका कामगार सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी उपसरपंच संतोष बरकाळे, सदस्य प्रकाश जठार, सूर्यकांत कुरडे, अरविंद जठार, सागर कांबळे, अभिजित पाटील, ग्रामसेवक तानाजी शिंदे, सचिव दयानंद कांबळे, सेवक प्रल्हाद कांबळे, अरुण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!