बातमी

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामर्फत मौजे सांगाव येथे शेतकरी मेळावा व ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक

कागल(विक्रांत कोरे) : सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. मार्फत मौजे सांगाव ता. कागल येथे यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखान्याच्या ऊस विकास योजनांची माहिती व प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आयओ टेक वर्ल्ड एविगेशन प्रा. लि. यांनी निर्माण केलेल्या ड्रोनची सर्व तांत्रिक माहिती व्हावी याकरिता या यंत्राचे फवारणी प्रात्यक्षिक करिता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कोल्हापूर (गोकुळ) चे संचालक नविद मुश्रीफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी जिल्हा परिषदचे सदस्य युवराज (बापू) पाटील यांनी होते.

यावेळी बोलताना, नविद मुश्रीफ यांनी संताजी कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्व योजनाचा पुरवठा करत आहे व यापुढे स्वयंचलित ठिबक संचन, समूह शेती याबरोबरच ड्रोन सारखे नवनविन आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार असल्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज (बापू) पाटील यांनी ड्रोनसारखे आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी मित्रांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचे नमूद केले. सदर कार्यक्रम प्रसंगी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने ऊस शेतीतील बदल व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच त्यामुळे निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधी यावर उपस्थित शेतकरी मित्रांना मार्गदर्शन केले.

ड्रोनचा वापर करून कमीत कमी पाणी तसेच कमीत कमी औषधे व विद्राव्य खते वापरून शेतीचे फवारणीची कामे

आयओ टेक वर्ल्ड एविगेशनचे असिस्टंट सेल्स मॅनेजर राहुल मगदूम यांनी ड्रोनचा वापर करून कमीत कमी पाणी तसेच कमीत कमी औषधे व विद्राव्य खते वापरून शेतीचे फवारणीची कामे कशी केली जातात, फक्त दहा लिटर पाण्यामध्ये सात मिनिटात एका एकरची फवारणी पूर्ण करून पैसे व वेळ यांची बचत कशी होते. रोबोटिक तंत्रज्ञानाचे फायदे याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या सर्व बाबीची मौजे.सांगाव येथील ऊस खोडवा, ऊस पिकातील आंतरपीक व आडसाली ऊस लागणीवर फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर, कागल तालुका सह. खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन अशोकराव नवाळे, मौजे सांगाव चे उपसरपंच माननीय पाटील, कोल्हापूर बाजार समितीचे माजी चेअरमन कृष्णात पाटील, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, कागल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक महेश चौगुले, सुळकुड चे माजी सरपंच अरुण पाटील, कसबा सांगाव चे सरपंच रणजित कांबळे संताजी शुगरचे ऊस विकास अधिकारी उत्तम परीट, कारखानेचे ॲग्री ओव्हरसीअर सागर पाटील, देवेंद्र जांभळे, विशाल केसरकर व युवराज पाटील, शेती मदतनीस व कर्मचारी तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *