गडहिंग्लज मधील गणेश मंडळांना समरजीतसिंह राजे घाटगे यांची भेट

गडहिंग्लज – धनंजय शेटके

Advertisements

भाजपचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष व श्री शाहु साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह राजे घाटगे यांनी गडहिंग्लज शहरातील गणेश मंडळांना सदिच्छा भेटी दिल्या.सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत.सर्वच राजकीय नेते मंडळींचे दौरे सुरू झाले आहेत.

Advertisements

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजेंचे स्वागत मोठ्या उत्साहात फटाके फोडून केले.राजेंनी पिराजी पेठ येथील स्वराज्य ग्रुपच्या गणरायाला भेट देत श्री गणेशाची आरती केली.यावेळी गडहिंग्लज फुटबॉल युनायटेड असोसिएशनच्या पिराजी पेठेतील व्यापारी मल्लिकार्जुन बेल्लद यांचा सत्कार राजेंच्या हस्ते करण्यात आला.तसेच बेल्लद यांना पुढील वाटचाली साठी राजेंनी शुभेच्छा दिल्या.या वेळी पिराजी पेठेतील सर्व नागरिक व सर्व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!