बातमी

चिमगांव येथील जागेची महावितरण कडून पाहणी; मुरगूडसह परिसरातील ५४ गावांचा वीजेच्या वापराचा प्रश्न मार्गी लागणार


मुरगूड ( शशी दरेकर्) :
मुरगूड शहर व परिसरातील ५४ गावाना लागणाऱ्या वीजेसाठी ३३ केव्हीचे वीज केंद्र मंजूर झाले आहे . त्यासाठी स्थापत्य विभागाच्या पथकाने आज चिमगांव येथील चिमकाईदेवी परिसरातील शासकीय गायरानाच्या जागेची पाहणी केली आहे. त्यामुळे हे केंद्र लवकरच उभारणीचा मार्ग मार्गस्थ होणार असल्याने ५४ गावांचा वीजेच्या वापराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मुरगूड शहर व परिसरातील ५४ गावे मुरगूड विभागात येतात या अंतर्गत औद्योगिक, कृषी, व्यापारी व घरगुती क्षेत्रातील हजारो वीज ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांना आवश्यक वीजपुरवठा मुदाळतिट्टा सबस्टेशन किंवा मुम्मेवाडी सबस्टेशन कडून घ्यावा लागत होता. त्यात अनेक वेळा तांत्रीक अडचणी येवून वीजपुरवठा होण्यात व्यत्यय येत होता. त्यामूळे मुरगूडला स्वतंत्र वीज केंद्र होण्याची गरज होती. ३३ केव्हीचे वीज केंद्र स्थापण्याचा वीज महावितरण कंपनी व ऊर्जा खात्याकडे प्रस्ताव प्रलंबित होता. खासदार संजय मंडलिक यांनी याचा पाठपुरावा केल्याने या प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी मिळाली होती. या वीज केंद्रासाठी दीड एकर जागेची गरज आहे . त्यासाठी चिमगांव ता- कागल येथील चिमकाईदेवी परिसरातील शासकीय गायरानाच्या जागेची स्थापत्य विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी एम थोरात, कनिष्ठ अभियंता एस पी दळवी, मुरगूड वीज वितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता महेश शेंडे, सहाय्यक अभियंता पी टी पाटील यांनी पाहणी केली आहे. त्यामुळे अंदाजे चार कोटीच्या या प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मार्गस्थ होणार आहे.

…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *