सानिका स्पोर्टस् चे नूतन अध्यक्ष रतन जगताप यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदी नंदकुमार खराडे

खजिनदार सागर सापळे, सचिव निशांत जाधव संपर्कप्रमुख जगदिश चितळे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील कोल्हापूर जिल्ह्यात नावाजलेले सानिका फाउंडेशन या मंडळाच्या अध्यक्षपदी रतन जगताप तर उपाध्यक्ष पदी नंदकुमार खराडे यांची एक मतांनी निवड झाली.

मुरगुड येथील कोल्हापूर जिल्ह्यात डे नाईट क्रिकेट स्पर्धा घेणारे व कागल तालुक्यातील नावाजलेले सानिका फौंडेशनच्या मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली . निवड समितीच्या अध्यक्षपदी निवासराव कदम तर प्रमुख उपस्थिती मंडळाचे मार्गदर्शक पांडुरंग कुडवे हे होते .
यावेळी स्वागत विनायक मुसळे यांनी केले तर प्रास्ताविक सानिका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले.

Advertisements

यावेळी विक्रांत बोरगावे, राजेंद्र सावंत ,सुरज मुसळे ,भाजप मुरगूड शहर अध्यक्ष अमर चौगुले, मा. नगरसेवक शिवाजी इंदलकर ,पांडुरंग पुजारी ,अमित पाटील , रमेश भोई, संजय वारके, राजू डवरी, अरविंद नरके ,दिलीप मांगले ,आशिष फर्नांडिस, गणेश तोडकर, भैय्या कुडवे, अजित राजिगरे, आलोक चव्हाण, तुषार डेळेकर आदी उपस्थित होते. सुत्र संचालन विकी बोरगावे यांनी केले तर आभार रणजित मोरबाळे यानी मानले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!