बातमी

निढोरी येथील सुवर्ण गणेश मंदिराचा गुरुवार व शुक्रवारी वास्तुशांती सोहळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी, ता. कागल येथे उत्तराभिमुख सुवर्ण गणेश मंदिराचा वास्तुशांती सोहळा येत्या गुरुवार दि. १४ आणि शुक्रवार दि. १५ रोजी होणार असल्याची माहिती संयोजनप्रमुख राजेंद्र आप्पासाहेब सुतार व ओमसाई बहुउद्देशीय कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

निपाणी -राधानगरी राष्ट्रीय महामार्गालगत उभारल्या गेलेल्या या मंदिरामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे. सोन्याची झळाळी असणारे अतिशय सुंदर, नक्षिदार व देखणे मंदिर आदमापूरच्या बाळूमामा तिर्थस्थळास भेट देणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांच्या सहजदृष्टीस येणारे आहे.

श्री गणेश मूर्तीची सवाद्य मिरवणूक गुरुवार दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वा.धार्मिक वातावरणात गावाच्या मुख्य मार्गावरून काढण्यात येणार आहे. मिरवणुकीचा मार्ग कागल रोड -लक्ष्मी नगर ते ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर मार्गे गावाच्या मुख्य मार्गावरून- सुवर्ण गणेश मंदिर असा असून या मिरवणूकीत गावातील विविध तरुण मंडळे, संघटना, परिसरातील भजनी मंडळे व ग्रामस्थ यांनी सहभाग घ्यावा.

शुक्रवार दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा. श्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री संत अमृतानंद महाराज (जंगली महाराज मठ गोरंबे) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२ नंतर महाप्रसाद वाटप, माहेरवासीनींना ओटी भरणे आणि रात्री ८ पासून रात्रभर सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविक भक्तांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

One Reply to “निढोरी येथील सुवर्ण गणेश मंदिराचा गुरुवार व शुक्रवारी वास्तुशांती सोहळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *