बातमी

मुरगूडमधील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याचा आदर्श गुंड ‘लाल आखाडा संकुल’ चा मानकरी

अनिकेत पाटीलने पटकाविला चौगले चषक

मुरगुड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने, विश्वनाथराव पाटील कला, क्रीडा, सांस्कृतिक व्यायाम मंडळ प्रणीत लाल आखाडा मुरगूड यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष, बिद्रीचे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त मॅटवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

बलदंड शरीराच्या पुण्याच्या आदर्श गुंड याने कोल्हापूरच्या राष्ट्रकुल आखाड्याच्या अक्षय मांगवडे यास ३ गुणांनी मात करून-लाल आखाड़ा केसरीच्या मानाच्या गदेसह रोख सव्वा लाखाचे बक्षीस पटकावले. ४६ किलो गटात हर्षवर्धन जाधव कुमार केसरी, तर ५७ किलो
गटात आमशीचा अनिकेत पाटील उपमहाराष्ट्र केसरी किताबाचा ( प्रकाश चौगले चषक) मानकरी ठरला.

यावेळी के. पी. पाटील, दीनानाथसिंह, नंदकुमार देंगे, पंडितराव केणे, देवानंद पाटील, धनाजी देसाई, विजयसिंह मोरे, उमेश भोईटे, जगदीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रथम क्रमांकाच्या लाल आखाडा केसरी कुस्तीत आदर्श गुंड याने अक्षय मांगवडेस सुरुवातीस झोला मारण्याचा प्रयत्न केला. काही वेळ दोघांनीही खडाखडी केली. गुंड याने अक्षयला हप्ते भरण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याने ३० अशा गुणफरकाने अक्षयला मात देत मानाची गदा पटकावली.

तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत सुनील खताळ, तर चतुर्थ क्रमांक सेनादलाच्या मनजितला मिळाला. ५७ किलो गटात अनिकेत पाटील (आमशी) याने प्रवीण वडगावकर याला सालतू व पट काढून ४-२ अशा गुणांनी पराभूत करत उपमहाराष्ट्र केसरी कै. प्रकाश चौगले चषक व गदा पटकावली, तर ४६ किलो वजन गटात हर्षवर्धन जाधव याने सुदेश जाधव याचा पराभव करत मानाची कुमार केसरी गदा पटकावली. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील
यांचा सत्कार आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

स्पर्धेतील विजेते मल्ल :

अविनाश पाटील, स्वप्नील साळुंखे, रितेश मगदूम, हर्षद जाधव, स्वराज्य कदम, राजवर्धन पाटील, प्रथमेश पाटील, हर्षवर्धन जाधव (कुमार केसरी गदेचा मानकरी), अजित कुद्रेमनकर, अनिकेत पाटील (आमशी), उपमहाराष्ट्र केसरी (प्रकाश चौगले चषक) ,सूरज अस्वले, संतोष परीट (बानगे), सौरभ पाटील, ऋषीकेश पाटील (बानगे).

स्पर्धेसाठी पंच म्हणून संभाजी वरुटे, मारुती जाधव, प्रकाश खोत, बापू लोखंडे, रवींद्र पाटील, बाळू मेटकर, सूरज मगदूम, सतीश सूर्यवंशी, के. बी. चौगले, सुरेश लंबे, आनंदा गोडसे, अशोक फराकटे, निवेदक राजाराम चौगले, बटू जाधव यांनी काम पाहिले.

माजी मंत्री हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, प्रवीणसिंह पाटील, दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील, सुधीर सावर्डेकर, संजय मोरबाळे, जगन्नाथ पुजारी, नामदेव भांदिगरे, राजू आमते, राहुल वंडकर, रणजित मगदूम, अमर देवळे, राजू सोरप गुरुदेव सूर्यवंशी,पांडुरंग पुजारी ,राजू चव्हाण ,शिवाजी मोरबाळे ,गणेश तोडकर, संपत कोळी ,आनंदराव कल्याणकर ,शिवाजीराव सातवेकर आदींच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *