कागल(प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमांना कागलमध्ये जोड़े मारो आंदोलन करून छत्रपती शिवाजी महाराजाबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आता.
कागल बसस्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात बोलताना जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांच्या अवमानाची सुपारीच घेतलेली आहे. अशातच आरएसएस पुरस्कृत असलेले भाजपचे पक्ष प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्यांचीही आज भर पडलेली आहे. महाराष्ट्रातील जनता है खपवून घेणार नाही.
यावेळी शहराध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक प्रवीण काळबर, इरफान मुजावर, नवाज मुश्रीफ, शहानूर पखाली, संग्राम लाड, राहुल चौगुले, उत्तम कांबळे, बच्चन कांबळे आदी उपस्थित होते.