मुरगूड (शशी दरेकर) : आपण समाजाचे काही तरी देणं लागतो . उपेक्षितांचे आयुष्य व त्यांचे जीवन सुंदर व्हावे. समाजात आजही काही लोक असहय वेदना घेऊन जगत आहेत. त्यानां जगण्याचे नवीन बळ मिळावे. हा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन कोल्हापूरच्या ” इनरव्हील क्लब ऑफ सनराईज ” या संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत उपेक्षित महिलेला शिलाई मशीन व दिव्यांग अमित राठोडला व्हिलचेअरची भेट दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
दिव्यांग अमित राठोड याला व्हिलचेअरची अत्यंत गरज असल्याची माहिती मोहन सातपुते यानीं दिली होती. त्यानुसार “इनरव्हिल क्लब ऑफ सनराईज ” या क्लबने आयोजित केलेल्या एका शानदार कार्यक्रमात जिल्हा अध्यक्षा महानंदाचं चंदरगी यांच्या हस्ते त्यानां भेट देण्यात आली . त्यानंतर भेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थितानां समाधान व या दोन्ही उपेक्षित कुटूबाप्रती दिलेल्या अनमोल भेटीतून आपुलकी व माणुसकीचे दर्शन घडत होते.
या कार्यक्रमास चेअरमन महानंदा चंदरगी, उत्कर्षा पाटील, डॉ .विद्युत शहा , क्लबच्या अध्यक्षा सोनाली पटेल , सेक्रेटरी सपना भालकर , सौ . सुरेखा जाधव , सौ . शिल्पा अष्टेकर , स्मिता खामकर , सामाजिक कार्यकर्ते मोहन सातपुते यांच्यासह क्लबचे सदस्य , माहिला , नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .