बातमी

मुरगूडच्या “नवकला सांस्कृतिक मंच चा” गडकिल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील ” नवकला सांस्कृतिक मंचतर्फे घेण्यात आलेल्या ” आम्ही छोटे मावळे ”गड किल्ले बांधणी ” स्पर्धैचा बक्षिस वितरण सोहळा मुरगूडच्या जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठया उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

पहिला क्रं . कुणाल भारमल ( विशाळगड ) , दुसरा क्रं . अनुज मेंडके ( रायगड ) , तिसरा क्रं . प्रतिक खराडे ( रायगड )
उत्तेजनार्थ -श्रेयश हासबे ( लोहगड ) , पृथ्विराज अस्वले ( रायगड ) , इतर प्रोत्साहन पुरस्कार -रुद्र बाबर ( प्रतापगड ) ,शौर्य सुतार ( रायगड ) , तुषार खराडे ( लोहगड ) , सुदर्शन बेळेकर, यश शिंदे ( पद्मदुर्ग ) , आयुष घोरपडे ( पन्हाळा ) , मयंक भोपळे ( सिंहगड ) एकता चव्हाण ( लोहगड ) अशी विजेतानां सन्मानचिन्ह व,बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिल्पकार , इतिहास अभ्यासक मा .एम .डी. रावण हे होते . ते म्हणाले लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व हल्ली मोबाईलचे वेड असणाऱ्या मुलानी इतिहासाचे महत्त्व आपल्या मनांवर बिंबवावे व आपल्यातील कलागुणाना वाव द्यावा असे आवाहन त्यानीं यावेळी केले . प्रथमच नवकला सांस्कृतिक मंचने या गडकिल्ले बांधणी स्पर्धाचे आयोजन केलेबद्दल मंचचे त्यानीं कौतूक केले .
या प्रसंगी परिक्षक संदीप मुसळे (सर) , वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यानीं मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमास लेखक पांडूरंग पाटील , शशी दरेकर ( पत्रकार ), राजू आमते, अतुल कुणकेकर, या प्रमुख पाहुण्यासह सर्वश्री संदेश पोतदार , सिद्धांत पोतदार , विनायक येरूडकर , अक्षय पोतदार, बापू सावर्डेकर, सिकंदर जमादार , श्रीपती खराडे , प्रदीप वर्णे, विवेक घोरपडे , जयशिंग सुतार , तुकाराम भारमल, आदी मान्यवरासह नागरिक , मंचचे सदस्य ,किल्ला बांधणी स्पर्धक मोठया संख्येने उपस्थित होते .
स्वागत अक्षय पोतदार, प्रास्ताविक ओंकार पोतदार , तर आभार दिग्वीजय येरुडकर यानीं मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *