खड्डे बुजवण्याची होत आहे मागणी
कागल( विक्रांत कोरे): करनूर- शेंडूर रोडवरती शेतीसाठी पाईपलाईन खुदाई केल्या आहेत त्यामुळे रस्ता खचला आहे व खड्ड्यांचे स्वरूप निर्माण झाले.
पाईपलाईन साठी रोड वरती केलेली खुदाई यामध्ये मोठ- मोठ्या चारी पडल्या आहेत. यामुळे वाहनधारकातून नाराजी व्यक्त होत आहे. अनेक छोटे-मोठे अपघात ही चारी मुळे झाले आहेत. अनेकांना कमरेचे त्रास जाणवत आहेत. तसेच रोडच्या दुतर्फा झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे समोरून येणारे वाहन लवकर दिसत नसल्याने अपघातांना निमंत्रण दिल्याचे होत आहे. त्यामुळे वाहनधारकातून या चारी लवकरात लवकर बुजवण्यात यावेत व दुतर्फा असलेले झुडपे काढण्यात यावीत अशी मागणी होत आहे.