एन. डी. पाटील यांचा अंत्यविधी करोना मुळे उद्या 20 लोकांच्या उपस्थितीत होणार

कोल्हापूर (ता. १७) : महाराष्ट्रातील प्रबोधन, पुरोगामी, परिवर्तनवादी, कष्टकरी, शेतकरी, कामगार चळवळींचे अग्रणी ज्येष्ठ नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा डॉ. एन. डी. पाटील हे आज वयाच्या त्र्याणव्या वर्षी कालवश झाले. उद्या मंगळवार ता. १८ जानेवारी रोजी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या (कदमवाडी रोड, सदरबाजार ) मैदानावर सकाळी ८ ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.कोरोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही. तसेच एन. डी. सर समाजवादी प्रबोधिनीचे व अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडा शिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे केवळ वीस लोकांच्या अर्थात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी शाहू कॉलेजवर अंत्यदर्शनासाठी यावे मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात तसेच मास्क, फिजिकल डिस्टनसिंग आणि महाविद्यालय परिसरात पार्किंग नियमांचे पालन करावे असे आवाहन एन. डी. सरांच्या पत्नी सरोजताई उर्फ माई पाटील व कुटुंबियांनी केले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!