सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी कल्याण संघटकांचा सुधारित मासिक दौरा

कोल्हापूर(जिमाका): सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचबरोबर कल्याण व पुनर्वसनच्या दृष्टीने योजना व सवलतीची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथील कल्याण संघटक यांचा माहे डिसेंबर 2024 चा सुधारित मासिक दौरा आयोजित करण्यात आला आहे. संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी … Read more

बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे … Read more

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मुत्सद्दी तसेच संयमी राजकारणी यशवंतराव बळवंतराव चव्हाण

महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झाली आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 पासून 19 नोव्हेंबर 1962 पर्यंत धुरा सांभाळली. त्यानंतर त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले तर ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव चव्हाण यांचे ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ असेही वर्णन केले जाते. नावातच यश आणि यशवंत असल्यामुळे त्यांना … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १० ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १० दिनांक २५-११-२०२४ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

जिल्ह्यातील 10 मतदारसंघातील मतमोजणी शांततेत संपन्न, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. दहाही मतदार संघातील विजयी झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत त्या त्या ठिकाणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये 271 चंदगड विधानसभा मतदार संघात शिवाजी पाटील विजयी, 272 राधानगरी विधानसभा मतदार संघात प्रकाश आबिटकर विजयी, 273 कागल विधानसभा मतदार संघात हसन मुश्रीफ विजयी, 274 कोल्हापूर … Read more

कागल विधानसभा २०२४ निकाल – हसन मुश्रीफ विजयी

26 फेरी अखेर मुश्रीफ 11879 मतांनी विजयी कागल विधानसभा २०२४ निकाल एकूण झालेले मतदान – 3,43,672  श्री. हसन मुश्रीफ – 1,43,828 श्री. समरजितसिंह घाटगे – 1,31,949 इतर – – सविस्तर माहिती पुढील प्रमाणे – मतमोजणी केंद्रावर सध्या मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून लवकरच मोजणी चालु होणार आहे बरोबर 8 वाजता मोजणी सुरू १ फेरी तील … Read more

कणेरीवाडीत युवकाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) :  ता.22 : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील हॉटेल पार्क इन जवळील शेतकरी पेट्रोल पंपा समोर अंदाजे आज पहाटे  6 वाजून 30 मिनिटांनी अपघात झाला. या अपघातामध्ये चार चाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक देवून सुमारे 40-50 फुट फरफटत नेले यावेळी निखिल मारुती खोत (वय 28, राहणार कणेरीवाडी अक्षता मंगल कार्यालयाजवळ) या युवकाचा … Read more

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान – जिल्हाधिकारी अमोल येडगे

  कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी उत्साहाने मतदान झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांसह प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याबरोबरच कोल्हापूर जिल्हावासियांनी उत्साहाने मतदान केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी आज दिली … Read more

डॉ. मा. ग .’गुरव यांच्या निसर्ग कन्या बालकाव्य संग्रहास राज्यस्तरिय पुरस्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड–वाघापूर (ता.भुदरगड)येथील  बाल साहित्यिक  व राष्ट्रीय आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार प्राप्त डाॅ.मा.ग.गुरव यांच्या, ‘निसर्गकन्या’ या बाल काव्य संग्रहास मुंबईच्या वंदना प्रकाशन पुरस्कृत, राज्यस्तर ‘आशीर्वाद ‘,पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थापक, साहित्यिक डाॅ. सुनील सावंत यांनी ही माहिती दिली असून येत्या ३०नोव्हेंबर २०२४,रोजी,दादर-माटुंगा येथील वा. ना. गोखले सभागृहात पुरस्कार वितरण केले … Read more

कागल विधानसभा साठी जोरदार  चुरशीने मतदान

कागल / प्रतिनिधी : कागल विधानसभा मतदार संघात किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. कागल विधानसभा मतदारसंघात सरासरी 81 टक्के मतदान झाले. मतदारा च उत्साह असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर मतदान शांततेत चालू होते.                 मतदारसंघात मतदान करण्यासाठी सकाळपासूनच चुरस दिसत होती. मतदान केंद्रासमोर महिलांच्या रांगा अधिक होत्या. लिंगनूर दुमाला येथील … Read more

error: Content is protected !!